Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

Sports: वीर अहलावतची वाटचालही तितकीच प्रेरणादायी आहे. २०२४चा पीजीटीआय ऑर्डर ऑफ मेरिट विजेता असलेल्या अहलावतने यंदाच्या देशांतर्गत मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2026 | 09:45 PM
DP World India Golf Championship

DP World India Golf Championship

Follow Us
Follow Us:
  • आशियाई स्पर्धेतील अनुभवामुळे भारतीय आव्हानाला बळ
  •  डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशिप
  • भारतीयांसाठी विशेष स्पर्धा,४० लाख डॉलर बक्षीस
पुणे/Sports: भारताचे आघाडीचे गोल्फपटू सप्तक तलवार, वीर अहलावत आणि युवराज संधू यांच्यासाठी अलीकडेच पार पडलेल्या आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणे हा (Pune) मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष गोल्फ संघाला पदक मिळवता आले नाही. मात्र, जपानमध्ये आशियातील सर्वोत्तम गोल्फपटूंविरुद्ध प्रचंड दडपणाखाली खेळण्याचा अनुभव या तिघांनी मिळवला. या स्पर्धेत अखेर सुवर्णपदक जिंकणारा टॉम किम; तसेच पीजीए टूरचा विजेता आणि माजी इंडियन ओपन चॅम्पियन केइटा नाकाजिमा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.

४० लाख डॉलर बक्षीस

या अनुभवाचा फायदा दिल्ली गोल्फ क्लबमध्ये १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या  डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंना नक्कीच होऊ शकतो. या स्पर्धेची तिकिटे सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून, ती ‘District’वरून खरेदी करता येणार आहेत. डीपी वर्ल्ड टूर आणि डीपी वर्ल्ड पीजीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ४० लाख अमेरिकी डॉलर आहे.

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप

भारतीयांसाठी विशेष स्पर्धा

भारतीय खेळाडूंसाठी या स्पर्धेचे महत्त्व आणखी मोठे आहे; कारण त्यांना रॉरी मॅकलरॉय, गतविजेता टॉमी फ्लीटवूड, द ओपन चॅम्पियन रायन फॉक्स, जस्टिन रोज, शेन लोरी, पॅट्रिक रीड, ल्यूक डोनाल्ड आणि पीजीए चॅम्पियनशिप विजेता अॅरॉन राय यांच्यासारख्या दिग्गजांविरुद्ध खेळण्याची संधी त्यांना मिळणार आहे. सप्तक तलवारची प्रगती विशेष उल्लेखनीय आहे. २७ वर्षीय तलवार यंदाच्या डीपी वर्ल्ड पीजीटीआय मोसमातील सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारतीय खेळाडू ठरला असून, तो ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये आघाडीवर आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर ओपन, कोलार आणि चेन्नई येथे त्याने टॉप-१०मध्ये स्थान मिळवले, तर अनेक स्पर्धांमध्ये टॉप-१५मध्ये राहण्याची कामगिरी केली.

तलवार फॉर्मात

आशियाई क्रीडा स्पर्धेत तलवारने चार-अंडर ६६च्या शानदार फेरीने मोहिमेला सुरुवात केली आणि तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यानंतर त्याने ६८ गुणांची फेरी खेळली आणि अखेरीस अंतिम फेरीत पुन्हा ६६ गुणांची नोंद करून संयुक्त सहावे स्थान मिळवले. हा केवळ चांगला निकाल नव्हता, तर भारतासाठी खेळताना अपेक्षांचे ओझे कसे सांभाळायचे, याचे चार फेऱ्यांमधून मिळालेले महत्त्वपूर्ण शिक्षणही होते. आता तो त्याच आत्मविश्वासासह दिल्लीच्या स्पर्धेत उतरणार आहे.

अहवालतची वाटचाल प्रेरणादायी

वीर अहलावतची वाटचालही तितकीच प्रेरणादायी आहे. २०२४चा पीजीटीआय ऑर्डर ऑफ मेरिट विजेता असलेल्या अहलावतने यंदाच्या देशांतर्गत मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याला विजेतेपद मिळवता आले नसले, तरी १२ स्पर्धांमध्ये त्याने नऊ वेळा टॉप-१०मध्ये स्थान मिळवले. त्यापैकी सात वेळा तो टॉप-५मध्ये राहिला. तेलंगणा ओपन, तेलंगणा मास्टर्स, चेन्नई ओपन आणि रायपूर ओपनमध्ये त्याने अनुक्रमे तिसरे स्थान मिळवले. त्यानंतर बेंगळुरू ओपनमध्ये त्याने तलवारसोबत संयुक्त तिसरे स्थान पटकावले.

युवराजला संधी

युवराज संधूला मात्र आंतरराष्ट्रीय गोल्फचा वेगळा आणि अधिक व्यापक अनुभव मिळाला आहे. २०२५चा पीजीटीआय ऑर्डर ऑफ मेरिट विजेता म्हणून त्याने डीपी वर्ल्ड टूरमध्ये प्रवेश मिळवला आणि यंदाचा बहुतांश मोसम युरोपमध्ये पूर्णवेळ गोल्फच्या आव्हानांना सामोरे जात घालवला. त्याचा मोसम कठीण गेला असला, तरी आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी त्याला महत्त्वाचे यश मिळाले. खराब हवामानामुळे त्याला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. तरीही त्याने परिस्थितीशी जुळवून घेत स्पर्धेत झुंज दिली.

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार

स्पर्धेला सहकार्य

डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशिपचे टायटल स्पॉन्सर डीपी वर्ल्ड, प्लॅटिनम स्पॉन्सर्स हिरो फिनक्रॉप, एएम ग्रीन आणि ब्लूमबेर्ग, प्रीमियम पार्टनर्स एडब्ल्यूएस, जीएमआर ऐरो आणि एचएसबीसी, अधिकृत पार्टनर्स अल्दार, एचसीएल टेक, ओमेगा, कोहलेर आणि एमिरेट्स; तसेच अधिकृत पुरवठादार बिस्लेरी, मेदांता, निकोबार, द ओबोराई, हाऊस ऑफ ग्लेनफिडिच, टेलरमेड इंडिया आणि पोकारी स्वीट यांचे या स्पर्धेला सहकार्य लाभले आहे.

 

Web Title: Dp world india golf championship at delhi 40 lakh dollors prizes sports news pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Japan
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
1

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
2

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
3

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
4

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.