
फोटो सौजन्य - Social Media
जॉईंट एंट्रन्स एक्जामिनेशन (JEE) मेन रिजल्ट २०२५ जाहीर करण्यात येणार आहे. JEE परीक्षा मेन २०२५ सेशन १ या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे. उमेदवारांना jeemain.nta.nic.in या लिंकवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना एका लॉगिन प्रकियेला पूर्ण करावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या संपूर्ण प्रक्रियेबद्दल:
अशा पद्धतीने उमेदवारांना त्याच्या JEE परीक्षा मेन २०२५ सेशन १ या परीक्षेचा निकाल पाहता येणार:
जेव्हा NTA नियोजित तारखेपूर्वीच निकाल अपलोड करण्याचा आणि अधिकृत वेबसाइटवर त्याची कार्यक्षमता तपासण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी असा एरर दिसून आला होता. अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. मात्र, सध्या जेईई मेन स्कोअरकार्ड तयार असल्याची माहिती समोर आली असून ते आज किंवा उद्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाऊ शकते. यंदा NTA ने 22 ते 30 जानेवारीदरम्यान जेईई मेन 2025 सत्र 1 परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या अंतिम उत्तरतालिकाही नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेत 12 प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. हटवलेल्या प्रश्नांसाठी सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.