फोटो सौजन्य - Social Media
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे नागपूरमध्ये विविध पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक उमेदवार या पदासाठी अर्ज करत आहेत. उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत देण्यात आली आहे. एकंदरीत, उमेदवार १२ फेब्रुवारीपर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हीदेखील AIIMS नागपूरमध्ये काम करण्याची इच्छा बाळगून आहात तर नक्कीच हे लेख संपूर्ण वाचा आणि इच्छुक असल्यास अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करा. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीच्या प्रक्रियेबद्दल:
AIIMS नागपूरद्वारे आयोजित या भरतीच्या प्रक्रियेमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. या पदांमध्ये तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ परिचारिका तसेच सामाजिक कार्यकर्तासारख्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी काम करण्यास इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि भरतीला सुरुवात करण्यात यावी. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://aiimsnagpur.edu.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावे लागणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यहात आली असल्याने अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी या जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
AIIMS नागपूरच्या या भरतीच्या माध्यमातून एकूण १३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मुळात, या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना पुढे बदलीचा सामना करावा लागणार नाही आहे. या भरतीसाठी काही पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवारांना या पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज करता उमेदवार आरोग्य / महामारीविज्ञान / सांख्यिकी / पर्यावरण विज्ञान या विषयांमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवार कामात अनुभवी हवा. कनिष्ठ परिचारिका पदासाठी बारावी शिक्षण निश्चित करण्यात आले आहे, तसेच ५ किमान ५ वर्षांचा अनुभव मागण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ता संबंधित क्षेत्रातील शिक्षण मागण्यात आला आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठीही अनुभव असणे महत्वाचे आहे.
तांत्रिक अधिकारी पदासाठी कमल वयोमर्यदा ४० वर्षे निश्चित केली आहे. तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमाह किमान वेतन ५० हजार देण्यात येईल. कनिष्ठ परिचारिका पदासाठी कमल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले असून नियुक्त उमेदवाराला २१ हजार रुपये दरमहा वेतन पुरवण्यात येईल. त्याचबरोबर माजिक कार्यकर्ता पदासाठी २० हजार रुपये दरमहा वेतन निश्चित करण्यात आले असून कमल वयोमर्यादा ३० वर्षे आयु ठरवण्यात आली आहे.