
Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Mumbai University Bharti 2026: नोकरी शोधताय का? मग ही बातमी तुमच्याच कामाची आहे. शिक्षण क्षेत्रात जायचं असेल तर मुंबई विद्यापीठाने एक चांगली संधी दिली आहे.QS World University Ranking नुसार मुंबई विद्यापीठाचा भारतात 17 वा नंबर लागतो. हे देशातलं सगळ्यात जुनं आणि मोठं विद्यापीठ आहे. अशा मोठ्या विद्यापीठात काम करण्याचा चान्स मिळत आहे. मुंबई विद्यापीठाने Assistant Professor पदासाठी भरती काढली आहे. ही भरती IDOL म्हणजेच Centre for Distance & Online Education साठी आहे. लक्षात ठेवा, ही परमनंट नोकरी नसून ही Ad-hoc basis वर म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे. Mumbai University Recruitment 2026:
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
ठिकाण – मुंबई
जागा किती? – जाहिरातीत नेमका आकडा दिला नाही, गरजेनुसार जागा भरल्या जातील.
यात कसलीही लेखी परीक्षा नसल्याने थेट मुलाखत होईल त्यामुळे तयारीत जा.
मुलाखतीच्या दोन तारखा आहेत – 9 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर 2026.
पत्ता – डॉ. शंकरदयाल शर्मा भवन, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400098.
तुमचा Bio-data, सगळी शैक्षणिक कागदपत्रं, अनुभव असेल तर त्याची कागदपत्रं ओरिजनल आणि झेरॉक्स घेऊन जायचं आहे.
प्रत्येक विषयासाठी शिक्षण वेगळं मागितलं आहे.