Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinamaxxing : ऑफिसमध्येच झोपून काम पूर्ण करायचा नवा जुगाड? Gen Z चा ट्रेन्ड होतोय तुफान व्हायरल!

कॉर्पोरेट जगतात प्रत्येक काळात काम करण्याच्या नवनवीन ट्रेन्ड समोर येत असतात. तसाच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ट्रेन्ड म्हणजे ‘चिनमॅक्सिंग’. पण हा Chinamaxxing ट्रेंड बराच विचित्र आणि वादग्रस्त ठरत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 04, 2026 | 05:05 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कॉर्पोरेट जगतात काम करण्याच्या नवनवीन ट्रेन्ड समोर
  • चिनमॅक्सिंगचा अर्थ काय?
  • उत्पादकता वाढते असा दावा
What is Chinamaxxing Trend : कॉर्पोरेट जगतात प्रत्येक काळात काम करण्याच्या नवनवीन ट्रेन्ड समोर येत असतात. तसाच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ट्रेन्ड म्हणजे ‘चिनमॅक्सिंग’. पण हा Chinamaxxing ट्रेंड बराच विचित्र आणि वादग्रस्त ठरत आहे. चीनमधील तरुण नोकरदार वर्ग आणि ‘जेन जी’ (Gen Z) पासून सुरू झालेला हा ट्रेंड आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये कर्मचारी कामाच्या वेळेत ब्रेक घेऊन आपल्या डेस्कवरच झोपून जातात. या ट्रेंडच्या समर्थकांचा असा दावा आहे की, हा ‘बर्नआउट’ म्हणजे अतिथकवा टाळण्याचा आणि कार्यक्षमता वाढवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.
या ट्रेंडला चीनमधील ‘996’ वर्क कल्चर जी सकाळी ९ ते रात्री ९, आठवड्याचे ६ दिवस काम या ट्रेन्डविरुद्धचा मौन विद्रोह मानला जात आहे. चिनमॅक्सिंगमध्ये कर्मचारी आपल्या डेस्कवर उशी, आय-मास्क आणि कधीकधी फोल्डिंग बेड देखील घेऊन येतात, जेणेकरून दुपारच्या वेळी एक छोटी झोप म्हणजे Power Nap घेतात. अनेक कॉर्पोरेट दिग्गज याला शिस्तहीन मानतात. तर काही जण याला वर्क लाइफ बॅलन्ससाठी एक महत्त्वाचं पाऊल मानत आहेत. काही जण याला वर्क-लाइफ बॅलन्सच्या दिशेने टाकलेले एक आवश्यक पाऊल मानत आहेत. जाणून घेऊया ‘चिनमॅक्सिंग’ नक्की काय आहे आणि का होतेय चर्चा?

MCL Recruitment 2026 : अरे वा! विना मुलाखत सरकारी नोकरीची संधी, Coal India मध्ये मेगाभरती, जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?

चिनमॅक्सिंगचा अर्थ काय?

‘चिनमॅक्सिंग’ हा शब्द चीन China आणि ‘मॅक्सिंग’ Maxxing म्हणजे एखाद्या गोष्टीला उच्च स्तरावर नेणे या दोन शब्दांपासून बनला आहे. हा शब्द अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरला जातो जे ऑफिसच्या डेस्कवर आपली Chin टेकवून किंवा डोके खाली डेक्सवर टेकवून झोपतात. हा ट्रेंड ‘लाइंग फ्लॅट’ आणि ‘लेट इट रॉट’ सारख्या छेडलेल्या आंदोलनांचाच पुढचा भाग आहे, जिथे तरुण आता अतोनात मेहनत करण्याऐवजी केवळ तितकेच काम करतात जेवढं आवश्यक आणि गरजेचं आहे.

उत्पादकता वाढते असा दावा

चिनमॅक्सिंग ट्रेंड फॉलो करणाऱ्या तरुणांचा असा उद्देश आहे की, १५-२० मिनिटांची गाढ झोप मेंदूला ‘रिसेट’ करता येतं. त्यांचं म्हणणे आहे की, सलग ८-१० तास कोणताही ब्रेक न घेता काम केल्याने मेंदू थकतो आणि चुका होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे चिनमॅक्सिंगच्या माध्यमातून ते स्वतःला ‘रिचार्ज’ करतात, ज्यामुळे ते अधिक एकाग्रतेने काम करू शकतात आणि त्यांना बर्नआउट जाणवत नाही.

कॉर्पोरेट जगात वाढता वाद

जिथे गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्या आपल्या ऑफिसमध्ये ‘स्लीप पॉड्स’ (Sleep Pods) उपलब्ध करून देतात, तिथेच जुन्या किंवा पारंपारिक कंपन्यांमध्ये डेस्कवर झोपणे आजही ‘रेड फ्लॅग’ म्हणजे धोक्याची घंटा मानतात. अनेक व्यवस्थापकांचे असे मत आहे की, यामुळे ऑफिसमधील शिस्त बिघडते आणि इतर कर्मचाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. काही तज्ज्ञांनी असा इशाराही दिला आहे की, याला ‘कामचोरपणा’ ठरवून कर्मचाऱ्यांच्या कपातीचे (Layoffs) कारण बनवले जाऊ शकते.

बर्नआउट आणि वर्क कल्चरवर परिणाम

चिनमॅक्सिंग हे केवळ झोपण्याबद्दल नाही, तर त्या ‘टॉक्सिक’ वर्क कल्चरवर केलेला प्रहार आहे जिथे कर्मचाऱ्याच्या आरोग्यापेक्षा कंपनीच्या फायद्याला जास्त महत्त्व दिले जाते. Gen Z  असं मानते की, जर कामाचे तास वाढत असतील, तर विश्रांतीच्या पद्धती देखील बदलायला हव्यात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक आणि रेड वर या ट्रेंडशी संबंधित हजारो व्हिडिओ उपलब्ध होत आहेत, जे या गोष्टीचा पुरावा आहेत की तरुण आता ‘हसल कल्चर’ला कंटाळले आहेत.

Fresher साठी आनंदाची बातमी! विमानतळावर काम करण्याची संधी, अर्ज प्रक्रिया आणि पगाराच्या तपशिलांबद्दल जाणून घ्या

Web Title: Jobs what is chinamaxxing know about gen z workplace trend mararthi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Career News
  • Gen Z
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
1

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
2

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
3

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
4

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.