नवनवीन तंत्रज्ञानातील उपक्रमांना चालना देण्यासाठी John Cockerill ग्रुपकडून आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार
मोठ्या प्रमाणात तांत्रिक उपाय विकसित करून अंमलात आणण्यातील आघाडीच्या जॉन कॉकरिल ग्रुपने भारतातील अग्रगण्य संशोधन आणि शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे) सोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या धोरणात्मक सहयोगाचे उद्दिष्ट स्टील डीकार्बोनायझेशन तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन मूल्य साखळी आणि संरक्षण उत्पादनांच्या विकासात नावीन्य आणणे आहे. त्यातून भारताच्या पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा आणि शाश्वतता या उद्दिष्टांच्या विकासात हातभार लागेल.
या सामंजस्य करारामुळे स्टील डीकार्बोनायझेशन तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन मूल्य साखळी आणि संरक्षण उत्पादने विकास या क्षेत्रातील संयुक्त संशोधन उपक्रमांना चालना मिळेल. शिवाय आयआयटी मुंबईची शैक्षणिक सर्वोत्तमता आणि जॉन कॉकरिलची अत्याधुनिक अभियांत्रिकी कौशल्ये एकत्र येतील. ही भागीदारी जागतिक स्टील क्षेत्राच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रामुख्याने शाश्वततेसाठी व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करेल. हा सहयोग भविष्यात भारतातील स्टील तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादने आणि उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि वापरासह ग्रीन हायड्रोजन मूल्य साखळीसाठी केंद्रांच्या स्थापनेसाठी उपयुक्त ठरेल.
राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेला होणार परीक्षा
या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल बोलताना जॉन कॉकरिलचे भारतातील प्रादेशिक अध्यक्ष आणि ग्रुप ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर विवेक भिडे म्हणाले की, “पोलाद, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रांसमोरील काही सर्वात महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देणारे नवीन उपाय आणण्याच्या आमच्या प्रवासात हा सामंजस्य करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयआयटी मुंबईची शैक्षणिक सर्वोत्तमता आणि आमच्या अभियांत्रिकी कौशल्याद्वारे आम्ही स्टील डीकार्बोनायझेशन, राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जेसाठी नवीन संधी आणण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”
आयआयटी मुंबईचे डीन (आर अँड डी) प्रा. सचिन पटवर्धन म्हणाले की, “आयआयटी मुंबई मूलभूत संशोधन आणि वास्तविक जगात त्याचा वापर यांतील अंतर भरून काढण्यासाठी तसेच उद्योग-शैक्षणिक भागीदारी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. जॉन कॉकरिल ग्रुपसोबतचा हा सहयोग तांत्रिक प्रगती आणि औद्योगिक उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या बदलात्मक संशोधनाला चालना देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आमची शैक्षणिक शक्ती त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याशी जोडून आम्ही गंभीर आव्हानांना तोंड देणारे आणि अर्थपूर्ण सामाजिक फायदे निर्माण करणारे प्रभावी उपाय विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”
Narcotics Control Bureau विभागात इन्स्पेक्टर पदी होणार नियुक्ती; मग वाट कसली पाहताय? आजच करा अर्ज
हा सहयोग जॉन कॉकरिलच्या भारताच्या ऊर्जा संक्रमणात भागीदारी करण्याच्या व्यापक वचनबद्धतेशी सुसंगत आहे. त्यात ग्रीन हायड्रोजन वापर, स्टील डीकार्बनायझिंग तंत्रज्ञान, प्रगत संरक्षण उत्पादने आणि स्त्रोतांच्या कार्यक्षमता उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. या सहयोगात इंटर्नशिप, डॉक्टरेट कार्यक्रम आणि प्राध्यापक विकास उपक्रमांद्वारे प्रतिभेला चालना देण्याचे प्रयत्न देखील केले जातील.