Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बु. ग्रामपंचायतीने 'अभ्यासाचा भोंगा' या अभिनव उपक्रमाद्वारे राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सकाळी आणि संध्याकाळी भोंगा वाजताच गावातील टीव्ही-मोबाईल बंद होतात आणि मुले अभ्यासाला बसतात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 06, 2026 | 04:01 PM
फक्त 'या' गावात वाजतोय 'अभ्यासाचा भोंगा'; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक (Photo Credit - AI)

फक्त 'या' गावात वाजतोय 'अभ्यासाचा भोंगा'; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मोबाईल-टीव्हीला फाटा!
  • सिल्लोडच्या सावखेडा गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’
  • राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक
Savkheda Gram Panchayat Sillod: सध्याच्या काळात टीव्ही आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असताना, सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बु. ग्रामपंचायतीने एक आदर्श पायंडा घालून दिला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ उपक्रमांतर्गत या गावाने ‘अभ्यासाचा भोंगा’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली असून, या उपक्रमात सावखेडा ग्रामपंचायतीने राज्यात दुसरा, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नेमका काय आहे ‘अभ्यासाचा भोंगा’?

गावातील टॉवरवर एक विशेष भोंगा बसवण्यात आला आहे. हा भोंगा दररोज सायंकाळी ७ वाजता आणि सकाळी ५ वाजता वाजतो. भोंगा वाजल्यानंतर पुढील दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवले जातात. या चार तासांच्या काळात गावातील सर्व विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करतातपालकांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ते स्वतः पाल्यांच्या अभ्यासावर लक्ष देत आहेत.

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

गावाचा कायापालट: सीसीटीव्ही ते शाळा सुशोभीकरण

केवळ अभ्यासाचा भोंगाच नव्हे, तर सावखेडा बु. आणि खुर्द या ग्रुप ग्रामपंचायतीने विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत. गावात कायमस्वरूपी स्वच्छता मोहीम आणि शाळांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. गावांतील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वनराई बंधारे बांधून पाणी पातळी वाढवण्याचे प्रयत्न झाले आहेत. महिला बचत गटांना बळ देऊन रोजगार निर्मितीवर भर दिला आहे.

प्रशासनाकडून कौतुक

सिल्लोडचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “मोबाईलमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत आहे. सावखेडा ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम आदर्श आहे. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही असे उपक्रम राबवावेत, यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू.” या यशासाठी सरपंच काशिनाथ गोरे, उपसरपंच प्रभाकर गोंगे, ग्रामसेवक व्ही. एस. ढोंगे आणि सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

Web Title: Only in this village is the study siren being sounded it ranks second in the state and first in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Sillod

संबंधित बातम्या

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें
1

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें

 ‘हंड्रेड मिलियन जॉब्स’ मोहिमेची घोषणा; भारताला पुढील दशकात १० कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य
2

 ‘हंड्रेड मिलियन जॉब्स’ मोहिमेची घोषणा; भारताला पुढील दशकात १० कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य

मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…
3

मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण
4

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.