
‘एबीव्हीपी’ च्या कार्यकर्त्यांनी ज्युबली फी ही अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी करत सिनेट सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती चिघळली.
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही द बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली. झटापटीदरम्यान काही विद्यार्थी खाली – पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
गोंधळ वाढू नये म्हणून पोलिसांनी काही – आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेनंतरविद्यापीठ प्रशासनाने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला असून परिसरात – शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. – दरम्यान, एबीव्हीपीने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर – बळाचा वापर केल्याचा आरोप केला असून – शांततामय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न – झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी – जमाव नियंत्रणासाठी कारवाई केली.
Ans: शिवाजी विद्यापीठात ज्युबली फीच्या विरोधात एबीव्हीपीकडून सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी दुपारी हिंसक वळण लागले. सिनेट सभेदरम्यान आंदोलक विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात झटापट झाली
Ans: विद्यापीठाकडून आकारली जाणारी ज्युबली फी अन्यायकारक असल्याचा आरोप करत ती तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.
Ans: आंदोलन करणारे एबीव्हीपीचे विद्यार्थी कार्यकर्ते आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेले पोलिस यांच्यात झटापट झाली.