जोतिबा डोंगराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना केवळ भौतिक सुविधांवर भर न देता, पूर्वीच्या काळातील नैसर्गिक देवराई उभी करण्याचा आमचा मानस आहे. ‘केदार विजय’ या धार्मिक ग्रंथात जोतिबा डोंगरावरील ज्या वृक्ष संपदेचे वर्णन केले आहे, त्या सर्व देशी प्रजातींची झाडे येथे लावली जात आहेत. याचबरोबर विशेष म्हणजे, महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी 20 वर्ष ते 1o0 वर्षांपूर्वीची मोठी झाडे तोडून नष्ट करण्याऐवजी, ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपित केली जात आहेत.
हे पर्यावरणीय पुनर्जीवन केदारण्य प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असून, यासाठी पर्यावरण तज्ज्ञासह चेन्नईमध्ये वृक्ष पुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातीलच तज्ज्ञ सुरेश जाधव यांच्या तांत्रिक मार्गदर्शन लाभत असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी प्रसंगी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प चंद्रकांत आयरेकर, गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘दख्खन केदारण्य’ या संकल्पनेतून साकारत असलेल्या या प्रकल्पामध्ये केवळ वृक्ष पुनर्रोपणच नव्हे, तर वृक्षसंगोपन आणि संवर्धनावरही भर दिला जात आहे. 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती. या उपक्रमात अनेक शेतकरी आपल्या शेतातील मोठी झाडेही श्री जोतिबा चरणी अर्पण करणार आहेत दुसऱ्या टप्यात सुमारे 350 वृक्षपुनर्रोपित होऊन ते पुर्ववत बहरणार आहेत.
Ans: या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला असून विकास आराखड्याची अंमलबजावणी जलद गतीने सुरू आहे.
Ans: या विकास आराखड्यात प्राचीन देवराईचे पुनरुज्जीवन देशी वृक्षप्रजातींची लागवड वृक्ष पुनर्रोपण, संगोपन व संवर्धन अध्यात्मिक व पर्यावरणीय संतुलन यांचा समावेश आहे.
Ans: 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती.






