Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KVS Report: गेल्या ८ वर्षांत प्राचार्यांची पदे रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले; केंद्रीय विद्यालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

Ministry of Education KVS Report: दर चार केंद्रीय विद्यालयांपैकी एका शाळेत नियमित प्राचार्य नाही. देशातील ३०० हून अधिक केव्ही शाळा 'प्रभारी' प्राचार्यांच्या भरवशावर कशा चालवल्या जात आहेत. शिक्षण मंत्रालयाने संसदेत सादर केलेली आकडेवारी काय सांगते? जाणून घ्या सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 01, 2026 | 03:48 PM
केंद्रीय विद्यालय

केंद्रीय विद्यालय

Follow Us
Follow Us:

Ministry of Education KVS Report: शाळांमध्ये प्राचार्यांचे असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. संपूर्ण व्यवस्थापनाचा भार त्यांच्याच खांद्यावर असतो. वर्गशिक्षकांपासून ते शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांपर्यंत सर्व बाबींची काळजी प्राचार्यांनाच घ्यावी लागते. परंतु, जर एखाद्या शाळेत नियमित प्राचार्य किंवा उप-प्राचार्यच नसतील, तर ती शाळा केवळ विविध शिक्षकांच्या भरवशावर कशी चालत असेल? याचा विचार केला तर तुमच्या मनातही शालेय शिक्षण आणि व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

शिक्षण मंत्रालयाने संसदेत केंद्रीय विद्यालयांमधील (KVs) ‘रेगुलर’ प्राचार्यांची आकडेवारी सादर केली आहे, जी जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या आकडेवारीनुसार, भारतातील ३०० हून अधिक केंद्रीय विद्यालयांमध्ये नियमित प्राचार्यच नाहीत. म्हणजेच दर चार के.व्ही शाळांपैकी एक शाळा अशी आहे, जी प्राचार्यांशिवाय चालवली जात आहे.

१३५६ पैकी ३४४ केंद्रीय विद्यालयांमध्ये ‘रेगुलर’ प्राचार्य नाहीत

शिक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, दरवर्षी नियमित प्राचार्यांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते, तरीही देशातील केंद्रीय शाळांमध्ये ही बिकट परिस्थिती आहे. येथील कामकाज सध्या ‘प्रभारी’ प्राचार्यांच्या भरवशावर सुरू आहे. अहवालानुसार, संपूर्ण देशात सध्या १३५६ केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी ३४४ शाळांमध्ये रेगुलर प्राचार्य नाहीत, तर केवळ १०१२ शाळांमध्येच नियमित किंवा ग्रेड-II प्राचार्य कार्यरत आहेत.

Law Admissions 2026-27: मुंबई विद्यापीठाविरोधात लॉ कॉलेजेस ‘या’ कारणास्तव उच्च न्यायालयात; आता निकाल कोणाच्या बाजूने लागणार?

दरवर्षी निघते भरती, तरीही पदे रिक्त!

शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या ८ वर्षांत नेतृत्वाची ही दरी अधिक वाढली आहे. पूर्वी मंजूर असलेल्या १०८१ पदांपैकी २०० पदे रिकामी होती. परंतु, काळाच्या ओघात केंद्रीय विद्यालयांची संख्या वाढल्याने हे नेटवर्क विस्तारले आहे. शाळांची संख्या वाढल्यासोबतच प्राचार्यांच्या रिक्त पदांची संख्याही वाढली, पण त्या तुलनेत भरती झाली नाही.

नवीन केंद्रीय विद्यालयांची सुरुवात होण्याव्यतिरिक्त प्राचार्यांची निवृत्ती, राजीनामे, पदोन्नती, बदल्या आणि इतर विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती यांसारख्या कारणांमुळे शाळांमध्ये नियमित प्राचार्यांची पदे रिक्त राहिली आहेत.

Parliament Jobs: संसदेत नोकरी करायची आहे? जाणून घ्या येथील विविध पदांची पात्रता अन् पगार!

प्राचार्यांशिवाय कशी चालते शाळा?

शिक्षण मंत्रालयानुसार, ज्या केंद्रीय विद्यालयांमध्ये प्राचार्यांचे पद रिक्त असते, तिथे के.व्ही.एसच्या (KVS) प्रादेशिक कार्यालयाकडून तात्पुरती सोय केली जाते. प्राचार्यांशिवाय असलेल्या शाळांमध्ये प्रशासकीय कामासाठी उप-प्राचार्य किंवा सर्वात वरिष्ठ शिक्षकाला शाळेचे ‘प्रभारी प्राचार्य’ बनवले जाते. काही प्रकरणांमध्ये, भरती प्रक्रिया सुरू असताना वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांचीही नियुक्ती केली जाते.

Web Title: Kvs report schools without regular principals education ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • education
  • education news

संबंधित बातम्या

BRICS Education : आता फक्त डिग्री पुरेशी नाही! ब्रिक्स देशांच्या नव्या अजेंड्यामुळे ‘या’ स्किल्सना येणार मोठी मागणी
1

BRICS Education : आता फक्त डिग्री पुरेशी नाही! ब्रिक्स देशांच्या नव्या अजेंड्यामुळे ‘या’ स्किल्सना येणार मोठी मागणी

धक्कादायक! MBBS ची फीस थेट ५६ टक्क्यांनी वाढली; एका झटक्यात १ कोटींवर पोहोचला शिक्षणाचा खर्च!
2

धक्कादायक! MBBS ची फीस थेट ५६ टक्क्यांनी वाढली; एका झटक्यात १ कोटींवर पोहोचला शिक्षणाचा खर्च!

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..
3

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
4

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.