
MBBS-BDS च्या १० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना संधी (फोटो सौजन्य - ChatGPT)
शासकीय महाविद्यालय, खाजगी महाविद्यालय आणि खाजगी विद्यापीठ मिळून ही संधी देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या शाखेतील विद्यार्थी किती प्रमाणात असतील याबाबात आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
MBBS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट
एमबीबीएसमध्ये ८४४२ विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या यादीत राज्यात एकूण ८५७९ जागा उपलब्ध आहेत त्यापैकी ८४४२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये शासकीय महाविद्यालयात ४९१०, खाजगी महाविद्यालयात ३१४९ व खाजगी विद्यापीठात ३८३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
तर बीडीएसमध्ये २४९६ विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. बीडीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या यादीत राज्यात एकूण २६१७ जागा उपलब्ध आहेत त्यापैकी २४९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये शासकीय महाविद्यालयात ३०२,खाजगी महाविद्यालयात २११३ व खाजगी विद्यापीठात ८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आता १३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर ( १४ सप्टेंबर २०२६ वगळून ) सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
बँकेच्या सुट्टीच्या दिवशी धनादेशद्वारे शुल्क भरण्यास परवानगी असेल. मात्र, पुढील कामकाजाच्या दिवशी तो डिमांड ड्राफ्टने बदलणे आवश्यक राहील. उमेदवाराने पुढील कामकाजाच्या दिवशी डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो, असे सीईटी कक्षाकडून कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच चांगली संधी असून आता गणपतीचा एक दिवस सोडून अन्य ५ दिवसात विद्यार्थी दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
MBBS Full Form History: ‘MBBS’ या डॉक्टर पदवीचा रंजक इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर..