Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महा TET परीक्षा झाली सुरळीत! ‘या’ दोन केंद्रावर आठ उमेदवारांची हकालपट्टी, पारदर्शकतेवर भर

महा-TET परीक्षेत ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० उमेदवार उपस्थित राहून ९३.९१% उपस्थितीची नोंद झाली. नांदेड आणि बीड येथील दोन केंद्रांत आठ उमेदवार गैरप्रकार करताना पकडले; समवेक्षकांवर चौकशीची कारवाई.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 27, 2025 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० परीक्षार्थी उपस्थित
  • ९३.९१% उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली
  • दोन परीक्षा केंद्रावर आठ उमेदवार हाकलण्यात आले
राज्यभरात २३ नोव्हेंबर रोजी TET (Teacher Eligibility Test) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. ३७ जिल्ह्यातील एकूण १,४२३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित केली गेली. त्यात ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० परीक्षार्थी उपस्थित होते. एकंदरीत, या परीक्षेत ९३.९१% उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली होती. या परीक्षेत सुरक्षिततेचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Mumbai News: भांडुपकरांनो! आनंदाची बातमी… पार पडले वाचनालय तसेच अभ्यासिकेचे उदघाटन

परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV बसवण्यात आले होते. तसेच यंदा नवीन तंत्रज्ञान म्हणजेच बायोमॅटिक तसेच AI चा वापर करून गैरप्रकार थांबवण्यात यश हाती आलेले दिसून येत आहे. उमेदवारांचे ओळखपत्र, फोटो तसेच इतर काही सुरक्षेच्या गोष्टी तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्यात आला होता.

नांदेड आणि बीड, या जिह्ल्यातील अशा दोन परीक्षा केंद्रावर आठ उमेदवार हाकलण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या समवेक्षकांचीही चौकशी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकार टाळण्यासाठी परिषद Active मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परीक्षा सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसेच परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत झाल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.

मुंबईतील शाळांमध्ये ‘संविधान दिना’चा जोश! विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली प्रतिज्ञा

शिक्षकांमध्ये असंतोष…

दरम्यान, यंदाची महा TET परीक्षेकडे अनेकांचे लक्ष लागून होते. कारण राज्यभरातील पहिली ते आठवी माध्यमांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आता TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होते. २०२७ पर्यंत जे शिक्षक TET पात्र करू शकणार नाहीत त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येईल आणि हातची नोकरी हातातून जाण्याचीही अफाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या TET परीक्षेत आधीपासून सेवेत रुजू असणारे शिक्षकही मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत.

Web Title: Maha tet exam in maharashtra state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • Maha TET
  • TET
  • TET Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.