Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवलेखकांच्या पहिल्या पूस्तक प्रकाशनासाठी शासनाकडून अनुदान; अर्ज कालावधी 1 ते 31 जानेवारी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2025 या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Dec 23, 2024 | 10:15 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2025 या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवलेखकांनी  दि. 1 ते 31 जानेवारी, 2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

या सहा वाङ्मय प्रकाराला मिळणार अनुदान

1) कविता (64 ते 96  मुद्रीत केलेली  पृष्ठे 80 कविता)

2) कथा (128 ते 144  मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द

3) नाटक/एकांकिका (64 ते 96 मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 28000 शब्द)

4) कादंबरी (128 ते 144 मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त 45000 शब्द)

5) बालवाङ्मय  (64 ते 96 मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त 28000)

6) वैचारिक लेख, ललितलेख, चरित्र, आत्मकथन, प्रवास वर्णन (128 ते 144 मुद्रीत केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द)

या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकुराला अनुदान देण्यात येईल. नमूद केलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही.

या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना 2025 माहितीपत्रक व अर्ज’ या शीर्षाखाली तसेच ‘What’s new’ या अंतर्गत ‘Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form’ या शीर्षकाखाली तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. दूरध्वनी क्र. 2432 5931 यावर संपर्क साधावा. 

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

सन 2024 वर्षातील मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय  पुरस्कार  देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2024  ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले प्रथम आवृत्ती पुस्तके स्पर्धेसाठी पात्र आहेत. लेखकांनी पुरस्काराच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

लेखक/प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका आणि पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर/पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी, 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेकरिता स्वीकारल्या जाणार नाहीत.

The deadline for submitting materials for the publication of the first book of new authors through the Maharashtra State Literature and Culture Board is January 31, 2025.

Web Title: Maharashtra government grants for publishing first book of new writers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 10:15 PM

Topics:  

  • book publication
  • maharashtra

संबंधित बातम्या

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
1

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
3

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.