
आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; 'हंडा मोर्चा' काढून प्रशासनाला धरले धारेवर
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, घोड नदीजवळ काळेवाडी-दरेकरवाडी ग्रामपंचायतीची विहीर आहे. या विहिरीसह परिसरातील इतर २ ते ३ विहिरींची पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. दरम्यान याच परिसरात नदीच्या पातळीजवळ एका नवीन विहिरीचे खोदकाम सुरू आहे. या नवीन खोदकामामुळेच आसपासच्या पारंपरिक विहिरींमधील पाणीसाठा आटला आहे का? याची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांची भेट घेऊन पिण्याच्या पाणी संदर्भात महिलांना होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी, तुमचे गाव अधिकृतपणे टंचाईग्रस्त घोषित नसल्याने सध्या टँकर सुरू करता येत नाही, असे तांत्रिक कारण पुढे केले. तसेच, तुमच्या वस्तीमध्ये अधिग्रहणासाठी कोणती विहीर उपलब्ध आहे का? अशी विचारणा केली.
हे सुद्धा वाचा : अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करावी
प्रशासनाने कागदी नियमांवर बोट न ठेवता गावरवाडीतील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ पाहणी करावी. विहिरींच्या पाणीपातळीची तांत्रिक तपासणी करून विहीर अधिग्रहणासह पर्यायी व्यवस्थेने तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी आक्रमक मागणी महिलांनी केली आहे. पाणी ही मानवाची मूलभूत गरज असून महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Ans: आंबेगाव तालुक्यातील गावरवाडी परिसरातील ग्रामपंचायतीच्या विहिरीसह इतर दोन ते तीन विहिरींची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
Ans: पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे ३० ते ४० महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
Ans: गावाची तातडीने पाहणी करावी, विहिरींच्या पाणीपातळीची तांत्रिक तपासणी करावी, विहीर अधिग्रहित करून पर्यायी व्यवस्था करावी आणि तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.