Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी रावेत आणि दुर्गा टेकडी लगतच्या जागेवर प्रस्तावित केलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला स्थानिक नागरिकांमधून प्रचंड विरोध सुरू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 05:27 PM
रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • रावेतमधील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा विरोध
  • प्रदूषण आणि आरोग्याच्या धोक्याबाबत नागरिकांची चिंता
  • २४ ऑक्टोबरला ज्ञानप्रबोधिनी शाळेत विशेष बैठक
पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी रावेत आणि दुर्गा टेकडी लगतच्या जागेवर प्रस्तावित केलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला स्थानिक नागरिकांमधून प्रचंड विरोध सुरू झाला आहे. “आमच्या जीवाशी का खेळता?” असा संतप्त सवाल विचारत, रावेत आणि निगडी प्राधिकरणातील सोसायट्या व नागरिकांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.

 

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर शहरात दररोज जमा होणाऱ्या सुमारे १५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने पर्यायी जागांचा शोध सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रालगत असलेल्या २५ एकर एमआयडीसीच्या जागेत २७ मेगावॉट क्षमतेचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्याची हालचाल प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. मात्र, हा प्रकल्प रहिवासी भाग, जलशुद्धीकरण केंद्र आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या दुर्गा टेकडीच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य आणि पर्यावरणाला धोका

नागरिकांच्या मते, निगडी प्राधिकरण आणि रावेत हा संपूर्ण परिसर शांत व विकसित निवासी भाग म्हणून ओळखला जातो. अशा वस्तीजवळ कचरा प्रकल्प आल्यास दुर्गंधी, वायुप्रदूषण आणि गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. लाखो नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ असा प्रकल्प उभारणे अत्यंत धोकादायक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

पुनावळेपाठोपाठ आता रावेतमध्येही संतापाची लाट

यापूर्वी पुनावळे येथील नियोजित कचरा डेपोच्या आरक्षणाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र जनआंदोलन करून हाणून पाडले होते. त्यानंतर प्रशासनाने रावेतचा पर्याय समोर आणला. मात्र, आता रावेत, निगडी आणि प्राधिकरणातील रहिवाशांनीही संघटित होत मोशी दुर्घटनेची पुनरावृत्ती आमच्या भागात होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

२४ ऑक्टोबरला ज्ञानप्रबोधिनी शाळेत जाहीर बैठक

या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात पुढील दिशा ठरवण्यासाठी ‘कचरा डेपो विरोधी कृती समिती, निगडी प्राधिकरण’ यांच्या वतीने शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळा (मनोहर गेटमधून प्रवेश) येथे नागरिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने लढा उभारून हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार समिती आणि स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प कुठे प्रस्तावित आहे?

    Ans: रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या २५ एकर एमआयडीसीच्या जागेवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

  • Que: नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध का आहे?

    Ans: दुर्गंधी, वायुप्रदूषण आणि आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

  • Que: नागरिकांची बैठक कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेत बैठक होणार आहे.

Web Title: Residents in ravet have opposed the waste to energy project nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nigdi
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
1

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Sangli News: साखर कामगारांचा आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप; सांगलीतील वसंतदादा कारखान्यासह ९ साखर कारखाने पडले बंद
2

Sangli News: साखर कामगारांचा आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप; सांगलीतील वसंतदादा कारखान्यासह ९ साखर कारखाने पडले बंद

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क
3

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क

Maharashtra Drought 2026: दुष्काळात ५ हजारांची घोषणा; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला साडीचोळीचा ‘आहेर’
4

Maharashtra Drought 2026: दुष्काळात ५ हजारांची घोषणा; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला साडीचोळीचा ‘आहेर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.