Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS doctors latest News : MBBS डॉक्टरांसाठी मोठा दिलासा! राज्य सरकारने अखेर रद्द केला ‘हा’ महत्त्वाचा नियम

MBBS doctors latest News : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पदवी पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाची बंधनकारक सेवा करावी लागत होती. मात्र, आता सरकारने हा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 24, 2026 | 04:11 PM
MBBS doctors latest News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

MBBS doctors latest News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकारने MBBS विद्यार्थ्यांसाठीची एक वर्षाची बंधनकारक सेवा रद्द केली.
  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
  • विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण किंवा करिअरची निवड अधिक स्वातंत्र्याने करता येणार आहे.
  • वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील हा राज्य सरकारचा महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय मानला जात आहे.
Mandatory MBBS Bond Service abolished: वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर करिअरचा पुढचा टप्पा उभा राहतो. त्यामध्ये काहीजण पुढील शिक्षणासाठी जातात, तर काही वैद्यकीय सेवेत रुजू होतात. मात्र, आत्तापर्यंत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातूव एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची बंधनकारक सेवा पूर्ण करावी लागत होती. आता या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. राज्यसरकारने ही सक्तीची सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे हजारो वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. (MBBS doctors latest News)

निर्णयाचा ‘या’ विद्यार्थ्यांना मोठा फायदा

या निर्णयामुळे खरतरं पीजी(PG) परिक्षेची तयारी कऱणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा थेट फायदा होईल, यापुर्वी अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळून सुद्धा त्यांना सेवा पूर्ण होत नाही, तो पर्यंत पुढील शिक्षण सुरु करता येत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष मागे पडत होते. आता हा अडथळा दूर झाल्याने विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक वाटचालीत अधिक वेगाने पुढे जाईल.

सरकारी वैद्यकीय शिक्षणावर सरकारकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीकाळ सरकारी किंवा ग्रामीण रुग्णालयांमध्ये सेवा देण्याची अट ठेवण्यात आली होती. या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना डॉक्टरांची सुविधा मिळावी आणि नव्या डॉक्टरांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, हा या व्यवस्थेचा उद्देश होता.

Career News: वॉलमार्टमध्ये मोठे व्यवस्थापन बदल; अमेरिकेतील प्रमुख पदावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती

करिअरच्या संधींवर परिणाम

मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढली, पण त्यानुसार सेवा देण्यासाठी उपलब्ध पदे वाढली नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळण्यासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. या विलंबामुळे पुढील शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधींवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून आले. सरकारने याच बाबींचा विचार करून अनिवार्य सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

‘हा’ निर्णय वेळेची गरज

या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेकांनी हा निर्णय वेळेची गरज असल्याचे म्हटले आहे. आता शिक्षण पूर्ण होताच इच्छुक विद्यार्थी थेट पीजी अभ्यासक्रम, संशोधन किंवा खासगी व सार्वजनिक आरोग्य सेवेत आपल्या पसंतीनुसार करिअरची दिशा ठरवू शकतील.

अनिवार्य सेवा बंद

तथापि, या निर्णयाकडे दुसऱ्या बाजूनेही पाहिले जात आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात आजही डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. अनिवार्य सेवा बंद झाल्यानंतर अशा भागांमध्ये नव्या डॉक्टरांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता आरोग्य क्षेत्रातील काही जाणकारांनी मांडली आहे.

अनेक सामाजिक संस्था आणि आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, सक्तीची सेवा रद्द करणे हा एक निर्णय असू शकतो, पण त्याचवेळी ग्रामीण भागात डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्रोत्साहन योजना तयार करणेही तितकेच आवश्यक आहे. चांगले वेतन, निवासाची सुविधा आणि सुरक्षित कामाचे वातावरण दिल्यास अनेक तरुण डॉक्टर स्वेच्छेने ग्रामीण भागात सेवा देण्यास तयार होतील, असे त्यांचे मत आहे.

Freelancers आणि व्यावसायिकांसाठी खुशखबर! ‘या’ आयकर नियमामुळे होऊ शकते मोठी करबचत

सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असला, तरी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेपुढे आता नवे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे पुढील काळात सरकार या रिक्त जागा कशा भरून काढते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी कोणती नवी पावले उचलते, याकडे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra government scraps mandatory one year bond service for mbbs graduates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Doctor
  • goverment news
  • MBBS

संबंधित बातम्या

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
1

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

MBBS प्रथम वर्ष पास न झाल्यास काय होते? जाणून घ्या बॉम्बे हायकोर्टाच्या या कठोर निर्णयामागचे मोठे सत्य!
2

MBBS प्रथम वर्ष पास न झाल्यास काय होते? जाणून घ्या बॉम्बे हायकोर्टाच्या या कठोर निर्णयामागचे मोठे सत्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.