Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड! राज्यात 98 टक्के प्रवेश पूर्ण

Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: महाराष्ट्रात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी MBBS आणि BDS अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील ११,४३१ जागांपैकी ११,२९३ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, एकूण ९८.७९ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 30, 2026 | 11:21 AM
Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • राज्यात MBBS-BDS च्या ९८.७९% जागा भरल्या.
  • सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये १००% प्रवेश पूर्ण.
  • सहा ऑनलाइन फेऱ्यांमुळे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक.

महाराष्ट्रात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच CET Cell ने 2026-27 या वर्षाची MBBS आणि BDS ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. यंदा जवळपास सगळ्या जागा भरल्या आहेत.

राज्यात एकूण 99 वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये आहेत. यामध्ये MBBS आणि BDS मिळून एकूण 11,431 जागा होत्या. त्यापैकी 11,293 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. म्हणजेच 98.79 टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. आता फक्त 138 जागा शिल्लक आहेत. सरकारी कॉलेजमध्ये तर 100% प्रवेश झाले आहेत. Maharashtra MBBS BDS Admission 2026-27:

यंदा नियमात काय बदल झाला?

गेल्या वर्षीपर्यंत काय होत होतं, CET Cell फक्त तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश करायचा. त्यानंतर जी काही जागा शिल्लक राहायची, ती कॉलेज स्वतः भरायचे. याला संस्थास्तरीय फेरी म्हणतात. पण यात अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी यायच्या. कुणाला जास्त पैसे मागितले, कुणाचा नंबर असूनही प्रवेश मिळाला नाही, अशा तक्रारी CET Cell कडे येत होत्या.हीच बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने यंदा नियम बदलला. सरकारने ठरवलं की सर्व प्रवेश CET Cell नेच करायचे. कोणत्याही कॉलेजला स्वतःहून प्रवेश देता येणार नाही.

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?

त्यामुळे यंदा तीन मुख्य फेऱ्या आणि नंतर रिक्त जागांसाठी आणखी तीन फेऱ्या अशा एकूण सहा फेऱ्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. याचा फायदा असा झाला की एकाही विद्यार्थ्याची तक्रार आली नाही. सगळं काम पारदर्शक पद्धतीने झालं.

MBBS ला किती प्रवेश झाले?

MBBS साठी राज्यात एकूण 70 कॉलेज आणि विद्यापीठे आहेत.

सरकारी कॉलेज – राज्यात 43 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात 5,065 जागा होत्या आणि सर्वच्या सर्व 100% भरल्या आहेत. एकही जागा रिकामी नाही.

खासगी कॉलेज – 25 खासगी कॉलेजमध्ये 3,299 जागा होत्या. त्यापैकी 3,260 जागांवर प्रवेश झाले असून फक्त 39 जागा रिकाम्या आहेत.डीम्ड

विद्यापीठ – 2 मोठ्या खासगी विद्यापीठांमध्ये 450 जागा होत्या, त्यापैकी 405 जागा भरल्या आहेत आणि 45 जागा शिल्लक आहेत.

एकूण विचार केला तर MBBS च्या 8,814 जागांपैकी 8,730 जागा भरल्या आहेत. म्हणजेच 99.04% MBBS प्रवेश पूर्ण झाले आहेत. फक्त 84 जागा शिल्लक आहेत.

BDS ची काय परिस्थिती आहे?

BDS म्हणजेच दातांच्या डॉक्टरच्या अभ्यासक्रमासाठी पण जवळपास सगळ्या जागा भरल्या आहेत.सरकारी कॉलेज – 5 सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये 317 जागा होत्या. त्यापैकी 315 जागांवर प्रवेश झाले आहेत. फक्त 2 जागा रिकाम्या आहेत. म्हणजेच 99.36% प्रवेश.

खासगी कॉलेज – 23 खासगी दंत महाविद्यालयांमध्ये 2,200 जागा होत्या. त्यापैकी 2,178 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. फक्त 22 जागा शिल्लक आहेत.

Income Tax Data 2025: १ कोटींपेक्षा जास्त पगार असणारे भारतीय किती? आयकर विभागाच्या आकडेवारीतून मोठा खुलासा!

MBBS आणि BDS दोन्ही मिळून राज्यात आता फक्त 138 जागा उरल्या आहेत. त्यापण खासगी आणि डीम्ड कॉलेजमधल्याच आहेत.एकंदरीत यंदाची प्रवेश प्रक्रिया अतिशय शांततेत आणि व्यवस्थित पार पडली आहे. ऑनलाईन सहा फेऱ्या घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप दिलासा मिळाला आहे

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रात २०२६-२७ मध्ये MBBS आणि BDS च्या किती जागा भरल्या?

    Ans: एकूण ११,४३१ जागांपैकी ११,२९३ जागांवर प्रवेश झाले आहेत.

  • Que: महाराष्ट्रात MBBS आणि BDS प्रवेशाची टक्केवारी किती आहे?

    Ans: एकूण ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत.

  • Que: सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील MBBS च्या किती जागा भरल्या?

    Ans: सरकारी महाविद्यालयांतील सर्व ५,०६५ जागा भरल्या आहेत.

Web Title: Maharashtra mbbs bds admission 2026 27 98 percent seats filled rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • maharashtra
  • MBBS
  • Medical Admission

संबंधित बातम्या

Bhandara News: ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू! परसवाडा नाल्याजवळील घटना; अल्पवयीन मुलगा गंभीर
1

Bhandara News: ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू! परसवाडा नाल्याजवळील घटना; अल्पवयीन मुलगा गंभीर

Neral Matheran Mini Train: माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार
2

Neral Matheran Mini Train: माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार

Matheran News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानमध्ये प्रवासी घोड्यांची वाहतूक ठप्प होणार?
3

Matheran News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानमध्ये प्रवासी घोड्यांची वाहतूक ठप्प होणार?

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
4

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.