Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Textbook Delay 2026:आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शालेय पुस्तकांना! शाळा सुरू, पण ६ वीची पुस्तके गायब!

Maharashtra School Textbook Delay 2026: इयत्ता ६ वी ची पुस्तके ३० जूनपर्यंत मिळणार आहेत. बालभारतीने छपाई विलंबाला युद्धजन्य परिस्थितीचे कारण दिले. तसेच बालभारतीच्या संचालक नेमक्या काय म्हणाल्या? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 16, 2026 | 12:20 PM
सहावी

सहावी

Follow Us
Follow Us:

Maharashtra School Textbook Delay 2026: विदर्भ वगळता सर्व शाळा कालपासून सुरू झाल्या असल्या तरी अजूनही नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके प्राप्त झाली नाहीत, त्यामुळे आता शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या सेतू पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिकवले जावे, असे सुचवले आहे. आता ही पुस्तके विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मिळतील असे बालभारतीने सांगितले आहे.

राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी इयत्तांचे अभ्यासक्रम बदलले असून ते नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संलग्न असतील. या नव्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची निर्मिती बालभारतीकडून दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली असली तरी एकाच वर्षी चार इयत्तांची पुस्तके तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पुस्तक छपाईसाठी विलंब झाल्याचे स्पष्टीकरण बालभारतीने दिले.

बालभारतीतील काही सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यंतरी उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका कच्च्या मालाला बसल्याने पाठ्यपुस्तक निर्मितीवर परिणाम झाला. या सर्व कारणांमुळे शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत इयत्ता सहावीची पुस्तके पाहायला मिळाली नाहीत.

SSC GD उत्तरतालिका जाहीर! ‘या’ ५ सोप्या स्टेप्सद्वारे त्वरित डाऊनलोड करा तुमची आन्सर-की

‘सेतू’ पुस्तकांचा ऑनलाईन पर्याय; पण इतर माध्यमांच्या शिक्षकांचे काय?

शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध होईपर्यंत एससीईआरटीने तयार केलेली सेतू पुस्तके वापरावीत, असे सांगण्यात आल्याचे काही शिक्षकांनी स्पष्ट केले. परंतु, ही पुस्तके ऑनलाईन स्वरूपात असल्याने त्यांची प्रिंट काढून ती वापरावी लागतील. तसेच ही पुस्तके फक्त मराठी माध्यमांसाठी उपलब्ध असल्याने अन्य माध्यमातील शिक्षकांनी काय करावे, असा प्रश्नही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

डॉ.अनुराधा ओक यांचे स्पष्टीकरण

इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीच्या सर्व माध्यमांची पुस्तके ही डेपोमधून पाठवण्यात आली आहेत. इयत्ता सहावीच्या मराठी माध्यमांच्या पुस्तकांचे प्रिंटिंग पूर्ण झाले असून त्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे बालभारतीच्या संचालक डॉ.अनुराधा ओक यांनी माहिती दिली . तसेच त्या म्हणाल्या की, शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत ४० टक्के पुस्तकांचे वितरण पूर्ण होईल, त्यानंतर आठवडाभरात मराठी माध्यमाची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती मिळतील.

UPSC Prelims Result 2026: नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; १३,३४३ उमेदवार पात्र, मुख्य परीक्षेसाठी पुढे काय करायचं?

Web Title: Maharashtra school reopen balbharati new syllabus textbook delay marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Alert Schools
  • balbharati
  • child

संबंधित बातम्या

Teacher Dress Code 2026: शासनाचा मोठा निर्णय! सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी; ‘हा’ असेल नवीन ड्रेस
1

Teacher Dress Code 2026: शासनाचा मोठा निर्णय! सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी; ‘हा’ असेल नवीन ड्रेस

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल!  ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार
2

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल! ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार

Childhood Health: खेळण्याच्या वयात मुलांना थकवा का जाणवतो? मुलांच्या शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

Childhood Health: खेळण्याच्या वयात मुलांना थकवा का जाणवतो? मुलांच्या शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.