Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra HSC Result 2026: बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांचा तणाव वाढला; राज्य मंडळाची समुपदेशन सेवा सुरू

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 02, 2026 | 02:56 PM
बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांचा तणाव वाढला; राज्य मंडळाची समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांचा तणाव वाढला; राज्य मंडळाची समुपदेशन सेवा सुरू

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) शनिवारी (२ मे, २०२६) महाराष्ट्र एचएससी निकाल २०२६ जाहीर केला. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुणा कुलकर्णी यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावर्षी इयत्ता १२वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट आणि थेट लिंक hscresult.mahahsscboard.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.

उत्तीर्णतेची टक्केवारी किती?

यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२वीच्या परीक्षेत एकूण ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, जे गेल्या वर्षीपेक्षा सुमारे २% कमी आहे. गेल्या वर्षी ९१.८८% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी, महाराष्ट्र एचएससी परीक्षेच्या निकालात एकूण ९१.८८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी, नोंदणी केलेल्या १४,४४,७१३ विद्यार्थ्यांपैकी १४,३३,०५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि १२,८६,८४३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.

शिक्षणाचा बोजवारा, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचा संताप; सरकारला दिला इशारा

बारावीचा निकाल हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट इत्यादी बनण्याची विद्यार्थ्यांची स्वप्ने या निकालावर अवलंबून असतात. अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुर्मानावर होऊ शकतो. त्यामुळे, अशा विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी राज्य मंडळाने स्वतंत्र असाइनमेंट सेवा सुरू केली आहे.

राज्य मंडळाने शनिवारी दुपारी 12 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर केला. यावर्षी १२वीच्या परीक्षेत २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. निकालात घट झाल्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवरही होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बारावीच्या निकालामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षित यश न मिळणे, विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, काही ठरावीक विषयामध्ये कमी गुण मिळणे असे प्रकार घडतात. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छित क्षेत्रात प्रवेश मिळत नाही किंवा शिक्षणाच्या अभावामुळे ते तणावाखाली येतात. तणावाखाली आलेले विद्यार्थी चुकीची पावले उचलतात. यामुळे आत्महत्येसारख्या घटना घडतात. त्यामुळे, विद्यार्थी चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत म्हणून, विद्यार्थी आणि पालकांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळाकडून दरवर्षी समुपदेशकांची नियुक्ती केली जाते.

समुपदेशन सेवा

निकालाच्या तणावातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळाने १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

समुपदेशन सेवेची वैशिष्ट्ये

कालावधी: कालाच्या दिवसापासून पुढील ८ दिवस

वेळ: काळी ८:०० ते रात्री ८:०० या वेळेत विद्यार्थांना संपर्क साधता येईल.

ही सेवा पूर्णपणे निशुल्क (मोफत) आहे

संपर्क क्रमांक (समुपदेशक)

विद्यार्थी किंवा पालक खालीलपैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

१ . ९९६०६४४४११

२ . ७९७२५७३७४२

३ . ९८३४०८४५९३

४ . ९३५९९७८३१५

५ . ८१६९२०२२१४

६ . ९३७१६६१२५५

७ . ७२०८४२९३८१

८ ७७०९१५६०६८

९ . ८४२११५०५२८

१० ९४०४७८३९९६

सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Maharashtra HSC Result 2026: सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरला; कॉपीमुक्त मोहिमेत 100 कर्मचाऱ्यांवर कारवाई, 15 FIR दाखल

Web Title: Maharashtra state board hsc result student counselling helpline numbers mental health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • HSC Exam 2026
  • maharashtra
  • Maharashtra HSC Result 2026

संबंधित बातम्या

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर
1

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?
2

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Dahi Handi 2026: दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांना मोठा दिलासा; उपचारांसाठी १ लाखांपर्यंत आर्थिक मदत
4

Dahi Handi 2026: दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांना मोठा दिलासा; उपचारांसाठी १ लाखांपर्यंत आर्थिक मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.