BUMS Student: (फोटो- सोशलमीडिया)
खुशबू कुमारी ही कटिहारची राहणारी येथे राहणारी आहे. ती शासकीय तिब्बी कॉलेजमध्ये BUMS करते तिचा दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागला. त्यात ती दोन विषयात नापास झाली. शैक्षणिक नियमांनुसार, विद्यापीठाने ठरलेल्या वेळेत दुसरी पुरवणी परीक्षा घ्यायला पाहिजे होती मात्र (AKU) आर्यभट्ट नॉलेज युनिव्हर्सिटीने आजपर्यंत दुसरी पुरवणी परीक्षा झालीच नाही. BUMS Student:
दरम्यान नियमानुसार विद्यापीठाने ठरलेल्या वेळेत दुसरी पुरवणी परीक्षा घ्यायला हवी होती. पण AKU म्हणजेच आर्यभट्ट नॉलेज युनिव्हर्सिटीने ती परीक्षाच घेतली नाही. आजपर्यंत दुसरी पुरवणी परीक्षा झालीच नाही.आणि इकडे तिसऱ्या वर्षाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर झाली. 3 ऑक्टोबरपासून तिसऱ्या वर्षाची परीक्षा सुरू होणार आहे. आता दुसरी पुरवणी परीक्षा झाली नाही तर खुशबूला तिसऱ्या वर्षाला बसताच येणार नव्हतं. तिचं पूर्ण एक वर्ष वाया जाणार होतं. म्हणून तिने हायकोर्टात याचिका टाकली.
SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
खुशबूच्या वकिलाने कोर्टात NCISM च्या राजपत्राचा हवाला दिला. ते म्हणाले, NCISM च्या नियमानुसार जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या वर्षात एक किंवा दोन विषयात नापास झाला तर त्याला तिसऱ्या वर्षात बसता येतं. त्याला पुढच्या वर्षात जाण्याची परवानगी आहे. त्यामुळे खुशबूला पण ही परवानगी मिळायला हवी.
कोर्टाने विद्यापीठाची चूक मान्य केली. कोर्ट म्हणालं, विद्यापीठाने वेळेत दुसरी पुरवणी परीक्षा न घेणं ही विद्यापीठाची चूक आहे. यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होतंय. विद्यार्थीचे वर्ष वाया जाईल ते योग्य ठरणार नाही. मुळे कोर्टाने AKU ला आदेश दिला की खुशबू कुमारीला 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या मुख्य परीक्षेला बसू द्या.इतकंच नाही तर कोर्टाने विद्यापीठ आणि कॉलेजला पण आदेश दिले आहेत.
SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
त्यांना सांगितलं की यासाठी एक पोर्टल सुरू करा, विद्यार्थिनीचा अर्ज आणि फी घ्या आणि तिला तात्पुरतं प्रवेशपत्र द्या.सोबतच कोर्टाने विद्यापीठाला हे पण सांगितलं की लवकरात लवकर दुसरी पुरवणी परीक्षा पण घेऊन टाका, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचं पण नुकसान होणार नाही.या निर्णयामुळे खुशबू कुमारीचं वर्ष वाचलं आहे आणि युनानी शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी पण हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.






