Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE चा मोठा निर्णय! आता शाळांमधील ‘काऊन्सलर्स’ची होणार AI द्वारे परीक्षा, सविस्तर वाचा

शाळांमधील 'स्कूल काऊन्सलर्स' म्हणजे समुपदेशक आणि 'वेलनेस शिक्षकांसाठी' कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ऑनलाईन मूल्यमापन परीक्षा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आता स्कूल काउन्सलर्सची निवड आता AI द्वारे होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 03:46 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CBSE ने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचललं
  • ‘वेलनेस शिक्षकांसाठी’ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ऑनलाईन मूल्यमापन परीक्षा सुरू
  • काय आहे ही नवीन मोहीम?
Major Decision by CBSE : शैक्षणिक क्षेत्रात वेळोवेळी बदल होत असतात. आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शालेय शिक्षण पद्धतीत आधुनिकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. आता शाळांमधील ‘स्कूल काऊन्सलर्स’ म्हणजे समुपदेशक आणि ‘वेलनेस शिक्षकांसाठी’ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ऑनलाईन मूल्यमापन परीक्षा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आता स्कूल काउन्सलर्सची निवड आता AI द्वारे होणार.

सैनिक शाळांमध्ये आता तंत्रज्ञानाचे धडे; अभ्यासक्रमात समाविष्ट होणार AI आणि डेटा सायन्स!

काय आहे ही नवीन मोहीम?

विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्याची काऊन्सलर्सची क्षमता तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा ‘क्षमता विकास कार्यक्रमाचा’ म्हणजेच Capacity Building Program चा एक भाग आहे. यामुळे शाळांमध्ये मुलांसाठी एक उत्तम Counseling System तयार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही व्यक्ती सक्षम असणार आहे.

परीक्षा कशी घेतली जाईल?

या परिक्षेचं स्वरुप ऑनलाईन आहे. त्यामुळे ते सोयीस्क ठरणार आहे. ही परीक्षा DIGI-EXAM प्लॅटफॉर्मवर घेतली जात असून, काऊन्सलर्स ही परीक्षा घरबसल्या देता येऊ शकते. मुख्य म्हणजे ही परीक्षा घेतली जात असताना AI ची नजर असणार आहे. परीक्षेदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी AI प्रोक्टरिंग सिस्टम वापरली जात आहे. ही म्हणजेच, कॅमेऱ्याद्वारे AI प्रत्येक हालचालीवर रिअल-टाइम लक्ष ठेवेल, ज्यामुळे कॉपी किंवा गैरप्रकार रोखले जातील. या परिक्षेचा सिलॅबस केवळ किताबी ज्ञान नाही तर या परीक्षेत केवळ पुस्तकी प्रश्न नसून, काऊन्सलर्स प्रत्यक्ष परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनात्मक समस्या कशा सोडवतात, याचे मूल्यमापन केले जाईल असा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत. या प्रक्रियेत देशभरातील एकूण १०,००० काऊन्सलर्स सहभागी होणार असून, फेब्रुवारी २०२६ पासून पहिल्या बॅचची सुरुवात झाली आहे.

कोणाला देता येणार ही परीक्षा?

सीबीएसई (CBSE) शाळांमध्ये कार्यरत असलेले स्कूल काऊन्सलर्स आणि वेलनेस टीचर्स ही परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबर सामाजिक आणि भावनात्मक समुपदेशन करणारे व्यावसायिक देखील परीक्षा देऊ शकतात. शाळांच्या पोर्टलवर ज्यांचे डेटा अपडेट आहे असे अधिकृत प्रोफेशनल्स या परिक्षेत सहभागी होऊ शकतात.

या परिक्षेमुळे काय होणार फायदा?

आजच्या धावपळीच्या युगात शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा आणि मानसिक ताण मोठा असतो. या परीक्षेमुळे काऊन्सलर्सना स्वतःच्या त्रुटी समजतील आणि ते अधिक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या समस्या हाताळू शकतील. केवळ प्रमाणपत्र देणे हा उद्देश नसून, काऊन्सलर्सना अधिक कार्यक्षम बनवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. थोडक्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांचे आणि काऊन्सलर्सचे मूल्यमापन करणे, ही काळाची गरज आहे. यामुळे शाळांमधील शिस्त आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यास मोठी मदत होणार आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘या’ Skills ची मोठी मागणी; Tech कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणं होईल सोपं

Web Title: Major decision by cbse school counselors to now undergo assessment via ai read for full details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • ai
  • Career News
  • CBSC

संबंधित बातम्या

AI Study Tricks: नोट्स शोधणे आणि स्टडी प्लॅन बनवण्यात वेळ जातोय? मग ‘या’ ३ एआय ट्रिक्समुळे अभ्यास होईल अगदी सोपा!
1

AI Study Tricks: नोट्स शोधणे आणि स्टडी प्लॅन बनवण्यात वेळ जातोय? मग ‘या’ ३ एआय ट्रिक्समुळे अभ्यास होईल अगदी सोपा!

Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी
2

Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी

AI Data Centers : भारतामध्ये किती आहेत डेटा सेंटर? ‘या’ टेक कंपन्या करत आहेत भारतात मोठी गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर..
3

AI Data Centers : भारतामध्ये किती आहेत डेटा सेंटर? ‘या’ टेक कंपन्या करत आहेत भारतात मोठी गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर..

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज
4

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.