फोटो सौजन्य- सोशल मीडिया
हार्मनी फाउंडेशनचे हे कर्जत तालुक्यात आरोग्य शिबिरे भरवत आहे. या संस्थेचे १७५ वे आरोग्य शिबिर माथेरान शहरात आयोजित करण्यात आले होते. माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संचालक नितीन कांदळगावकर, नम्रता नितीन कांदळगावकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी संस्थेचे सुभाष अर्जुन भोसले यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला माथेरान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, शिक्षक लक्ष्मण ढेबे यांनी भेट दिली.
माथेरान नगरपरिषदेच्या हुतात्मा वीर भाई कोतवाल शाळेतील विद्यार्थी तसेच पालकांची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुनील साळुंके यांनी कान, नाक, घसा तसेच जनरल तपासणी करून विद्यार्थी आणि पालकांवर योग्य ते उपचार केले.
Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..






