Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमसीए अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या CAP फेरीची यादी जाहीर केली. १६,९८७ विद्यार्थ्यांपैकी ७,४०७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असून ६,३२७ जणांना पहिल्या तीन पसंतींपैकी एक कॉलेज मिळाले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 09:10 PM
राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ

Follow Us
Follow Us:
  • ६ हजार ३२७ विद्यार्थ्यांना मिळाले पसंतीचे महाविद्यालय
  • दुसऱ्या फेरीसाठी १६ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी दाखविली पसंती
  • मिळालेले महाविद्यालय निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार.
 

नीता परब, मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन – एमसीए या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या दुसऱ्या यादीत १६ हजार ९८७ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच दुसऱ्या यादीमध्ये ६ हजार ३२७ विद्यार्थांना त्यांनी दिलेल्या पहिल्या तीनपैकी त्यांच्या एका पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

राज्यात दुसऱ्या फेरीसाठी एकूण १८ हजार ०९० जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत १६ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार दुसऱ्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत.

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

६ हजार ३२७ विद्यार्थ्यांना मिळाले पसंतीचे महाविद्यालय

दुसऱ्या फेरीत ६ हजार ३२७ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या तीनपैकी एका पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे हे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्याना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना तिसऱ्या व चौथ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत उतरावे लागेल.

ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आता १७ ऑगस्ट पर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर १८ ऑगस्टला तिसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत.

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

Web Title: Mca admission 2026 second cap round maharashtra 7407 students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Career News
  • MCA
  • Student

संबंधित बातम्या

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ
1

RBI Vacancy 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी! रोज मिळणार तब्बल रू. 3000, फार्मसी शिकणाऱ्यांची चंगळ

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई
2

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.