Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Mega Bharti : तरुणांनो तयारीला लागा! राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Mega Bharti news : तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून, रिक्त पदांसाठी राज्य शासन 'मेगा भरती' करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 07, 2025 | 05:49 PM
तरुणांनो तयारीला लागा! राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच 'मेगा भरती', देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (फोटो सौजन्य-X)

तरुणांनो तयारीला लागा! राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच 'मेगा भरती', देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Mega Bharti news in Marathi: नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात लवकरच रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणे, आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन ‘मेगा भरती’ करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

परीक्षेसाठी अर्ज करण्यात आलेल्या फॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी दुरुस्ती विंडो उघड, असा भरा फॉर्म

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉ. नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थिती केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील काळात शासनाने ७५ हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार एक लाखांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली. शासन पदभरतीबाबत कुठेही मागे पुढे पाहणार नाही. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील ६,८६० पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कार्यरत आहे. मात्र त्यांना २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्ण दृष्टीने विचार करीत ही पदे अधिसंख्य केली. या पदांवर कार्यरत असलेल्यांना बढती मिळणार नाही. पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे व्यपगत होतील. अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदूनामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवण्यात येणार नाही.

अधिसंख्य असलेली ६ हजार ८६० पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भरती करण्याकरिता रिक्त झालेली आहे. त्यापैकी १३४३ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर भरती केलेली आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉक चेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी करताना कागदपत्रे तपासणे सोयीचे होईल. तसेच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सक्षम करण्यात येत आहे. अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल. या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांची पदे वारसा हक्काने भरण्याबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे. लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार ही पदे वारसा हक्काने भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या पदांसाठीही भरतीही करण्यात येणार आहे.

DFCCIL प्रवेशपत्र २०२५ ‘या’ अधिकृत संकेतस्थळावर जाहीर, असे करा डाउनलोड

Web Title: Mega recruitment for vacant posts in the state a major announcement by devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Job
  • maharashtra

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
1

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!
2

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
3

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले
4

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.