Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सीए अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2026 | 02:35 AM
Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात 'एमएमसीसी'चे १२ विद्यार्थी झाले Charted Accountant

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात 'एमएमसीसी'चे १२ विद्यार्थी झाले Charted Accountant

Follow Us
Follow Us:
  • पहिल्याच प्रयत्नात एमएमसीसीच्या १२ विद्यार्थ्यांनी मिळविली सीए पदवी
  • एमएमसीसी महाविद्यालयाच्या गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा
  • प्राचार्य बी. जी. जाधव यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा घेतला आढावा 
पुणे: मराठवाडा मित्र मंडळाच्या (एमएमसीसी) वाणिज्य महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत चार्टर्ड अकाउंटंट ही प्रतिष्ठेची पदवी संपादन केली. या उल्लेखनीय यशाबद्दल मराठवाडा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सीए पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यश ठिगळे, (Career News) प्रणव पाटील, स्वराली गोगटे, स्मिएट बोथरा, मृणाल नलावडे, रश्मी चौधरी, सोहम इनामदार, जयेश जाधव, उज्ज्वल अग्रवाल, अनुष्का तावरे, नचिकेत पुणेकर आणि ललित पाटील यांचा समावेश आहे.

एमएमसीसी संस्थेचे संस्थापक प्राचार्य बी. जी. जाधव यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. एका बॅचमधील १२ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणे ही संस्था सातत्याने करत असलेल्या प्रगतीची आणि दर्जेदार शिक्षणाच्या बांधिलकीची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

CA Final Result 2025: सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा; ६०% हून अधिक निकाल, तीन विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रँक’!

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सीए अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे यश हे महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचे प्रतीक असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा

सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल (CA Final Exam Result 2025) सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून, आरव्हीजी एज्युकेशनल फाउंडेशनच्या (RVG Educational Foundation) विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नेत्रदीपक यश मिळवत संस्थेचा गौरव वाढवला आहे.

क्रिमिनॉलॉजिस्ट बना, गुन्हेगारीमागचे विज्ञान समजून घ्या! जाणून घ्या पात्रता, कोर्सेस आणि करिअरच्या संधी

यंदा आरव्हीजी फाउंडेशनचे एकूण ७३ विद्यार्थी यशस्वीरित्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी तीन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय स्तरावर (All India Rank – AIR) यश मिळवले आहे, ज्यात AIR ४३, AIR ४४ आणि AIR ४९ या रँक्सचा समावेश आहे. उत्कृष्टतेची आपली परंपरा कायम राखत, आरव्हीजीने ६०% हून अधिक उत्तीर्णतेचे उल्लेखनीय प्रमाण राखले आहे. हा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे महत्त्वाकांक्षी चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी आरव्हीजी हे देशातील सर्वात प्रतिष्ठित शिक्षण केंद्रांपैकी एक म्हणून सिद्ध झाले आहे.

 

 

Web Title: Mmcc commerce 12 students charted accountant exam in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Career News
  • chartered accountant
  • pune news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
2

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.