Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘B.Com’च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! मुंबई विद्यापीठाने १६ दिवसांत जाहीर केला निकाल; ४०.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Mumbai University B.Com Result 2026: मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ चा निकाल अवघ्या १६ दिवसांत जाहीर केला आहे. ४०.९७ टक्के निकाल लागला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 08:57 PM
B.Com'च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! मुंबई विद्यापीठाने १६ दिवसांत जाहीर केला निकाल (Photo Credit- X)

B.Com'च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! मुंबई विद्यापीठाने १६ दिवसांत जाहीर केला निकाल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘B.Com’च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली!
  • मुंबई विद्यापीठाने १६ दिवसांत जाहीर केला निकाल
  • ४०.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
नीती परब/मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यावर्षी उन्हाळी सत्राच्या निकालात मोठी गती दाखवली आहे. मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बीकॉम (सत्र ५) परीक्षेचा निकाल विद्यापीठाने अवघ्या १६ दिवसांत जाहीर केला आहे. परीक्षा संपल्यानंतर अत्यंत जलद गतीने मूल्यांकन प्रक्रिया राबवून विद्यापीठाने हा निकाल प्रसिद्ध केला.

निकालाची आकडेवारी काय सांगते?

यावर्षी बीकॉम सत्र ५ च्या परीक्षेसाठी एकूण २५,९२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३,९६५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल ४०.९७ टक्के लागला असून, एकूण ९,८११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल कुठे पाहायचा?

विद्यार्थ्यांना आपला निकाल मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:  https://www.mumresults.in/

सुक्ष्म नियोजन आणि जलद मूल्यमापन

उन्हाळी सत्र २०२६ चे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाने विशेष नियोजन केले होते. परीक्षा संपल्यापासून ते पेपर तपासणीपर्यंतची प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले. या यशाबद्दल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे आभार मानले आहेत.

Education News: “विद्यार्थ्यांचे शुल्क ६% व्याजासह परत…”; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उद्यापासून ‘CET’चा रणसंग्राम

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम ), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश परीक्षा मंगळवार (२८ एप्रिल २०२६) पासून सुरु होत आहे. हि सीईटी २८ व २९ एप्रिल २०२६ या दोन दिवशी घेण्यात येणार आहे. या सात अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यात ३६ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ७१,०६७ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएससाठी ७१ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

यावर्षी बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ७१,०६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये ३५५ अनाथ विद्यार्थी व ३२३ दिव्यांग विद्यार्थी ही सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. २०२५ च्या बी.एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १४३६ व बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १,१२,९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

SSC Recruitment 2026: सरकारी नोकरीची संधी! हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती सुरू; कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

Web Title: Mumbai university tybcom sem 5 result declared in 16 days check online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Career News
  • Mumbai University
  • Student

संबंधित बातम्या

Delhi University निवडणूक! कोण बनू शकतं उमेदवार? हायकोर्टाचा निर्णय अन् खर्चाची मर्यादा एकदा वाचाच
1

Delhi University निवडणूक! कोण बनू शकतं उमेदवार? हायकोर्टाचा निर्णय अन् खर्चाची मर्यादा एकदा वाचाच

US OPT Fee Proposal: अमेरिकेत नोकरी करणे आता ९६ लाखांनी महागणार? ट्रम्प प्रशासनाचे OPT साठी नवे शुल्क धोरण
2

US OPT Fee Proposal: अमेरिकेत नोकरी करणे आता ९६ लाखांनी महागणार? ट्रम्प प्रशासनाचे OPT साठी नवे शुल्क धोरण

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर
3

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण
4

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.