Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.

National Teachers Award: देशातील उत्कृष्ट शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' दिला जातो. या पुरस्कारासाठी नामांकन कसे केले जाते? यासाठी निवड प्रक्रिया आणि मिळणारे लाभ काय आहेत? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 30, 2026 | 03:21 PM
teacher award

teacher award

Follow Us
Follow Us:

National Teachers Award 2026: दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त देशातील काही निवडक शिक्षकांना एका अत्यंत विशेष सन्मानाने गौरविले जाते, तो सन्मान म्हणजेच ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’. हा पुरस्कार केवळ एक ट्रॉफी नसून, तो शिक्षकांची मेहनत, समर्पण आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणाऱ्या त्यांच्या योगदानाची ओळख पटवण्याचे एक माध्यम आहे.

हा पुरस्कार नेमका काय आहे?

देशभरातील ज्या शिक्षकांनी आपापल्या शाळा, महाविद्यालये किंवा संस्थांमध्ये शिकवण्याच्या पद्धतींमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, अशा शिक्षकांना शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिला जातो. शिक्षकांचे नावीन्यपूर्ण प्रयोग, निष्ठा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान समोर आणणे हा यामागचा उद्देश आहे, जेणेकरून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळू शकेल.

कोण करू शकते नामांकन?

यासाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.

सेल्फ नॉमिनेशन: यामध्ये शिक्षक स्वतः आपला फॉर्म भरू शकतात.

इन्स्टिट्यूशनल नॉमिनेशन: यामध्ये कॉलेज किंवा संस्थेचे प्रमुख एखाद्या शिक्षकाचे नाव पुढे पाठवू शकतात.

पीयर नॉमिनेशन: यामध्ये त्याच संस्थेतील सहकारी शिक्षक एखाद्या फॅकल्टी मेंबरचे नाव नामांकित करू शकतात.
अर्ज अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर करावा लागतो आणि त्यासोबत शिक्षकांना आपल्या कामाशी संबंधित कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ आणि उपलब्ध्यांचे संपूर्ण पोर्टफोलिओ देखील जमा करावा लागतो.

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

अशी होते कडक छाननी

निवड प्रक्रिया सोपी नसते. सर्वात प्रथम जिल्हा किंवा प्रादेशिक स्तरावर अर्जांची छाननी होते, त्यानंतर राज्य किंवा संघटना स्तरावर मूल्यांकन होते आणि शेवटी एक स्वतंत्र राष्ट्रीय जूरी अंतिम निर्णय घेते. एकूणच, तीन टप्प्यांमधून गेल्यानंतरच एखाद्या शिक्षकाचे नाव अंतिम यादीत समाविष्ट केले जाते. मूल्यांकनामध्ये शिक्षकाचे कार्य आणि कामगिरीशी संबंधित निकषांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.

किती शिक्षकांना मिळतो हा सन्मान?

या पुरस्कारासाठी निवडल्या जाणाऱ्या शिक्षकांची संख्या दरवर्षी निश्चित नसते, ती दरवर्षी थोडी बदलत जाते. अलीकडच्या वर्षांत हा आकडा ४८ ते ५० शिक्षकांच्या दरम्यान राहिला आहे, ज्यामध्ये शाळा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाशी संबंधित शिक्षकांचाही समावेश असतो. निवडलेल्या शिक्षकांमध्ये महिला आणि पुरुष दोघेही समाविष्ट असतात आणि ते वेगवेगळ्या राज्यांचा व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात.

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या

सन्मानासोबत काय मिळते?

पुरस्कार मिळणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त एका विशेष समारंभात सन्मानित केले जाते, ज्यामध्ये प्रमाणपत्र, पदक आणि स्मृतीचिन्ह दिले जाते. हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण शिक्षक समुदायासाठी अभिमानाचा क्षण असतो, जो हे दर्शवतो की मेहनत आणि निष्ठेने केलेले काम कधीही दुर्लक्षित होत नाही.

Web Title: National teachers award eligibility and nomination process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • awarded
  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
2

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
3

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.