Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education New Rules: NEET-JEE च्या रँकिंगसाठी १२ वीचे गुण ठरणार का गेमचेंजर? शिक्षण मंत्रालयाचा ‘हा’ नवा ‘वेटेज प्लॅन’ लगेच वाचा

NEET-JEE Education New Rules: NEET आणि JEE परीक्षांमध्ये मोठे बदल करण्याची शिक्षण मंत्रालयाची तयारी. आता प्रवेश परीक्षेसोबतच १२ वी बोर्डाच्या निकालाला निश्चित 'वेटेज' मिळणार आहे. डमी स्कूल्स आणि कोचिंग कल्चर रोखण्यासाठी सरकारचा नवा मास्टर प्लॅन वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 04, 2026 | 02:31 PM
NEW RULE

NEW RULE

Follow Us
Follow Us:

NEET-JEE Education New Rules: दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनीअर बनण्याचे स्वप्न घेऊन नीट आणि जेईई सारख्या कठीण परीक्षांची तयारी करतात. परंतू,   अलीकडच्या काळात या परीक्षांवरून झालेले वाद आणि कोचिंग सेंटर्सचा वाढत्या दबावाला लक्षात घेता, केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालय मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. मेडिकल आणि इंजिनीअरिंग संस्थांमध्ये प्रवेशासाठी केवळ एट्रांन्स एग्झामच्या गुणांवर अवलंबून राहण्याऐवजी, मंत्रालयाकडून आता १२ वी बोर्डाच्या निकालाला देखील एक निश्चित ‘वेटेज’ (प्राधान्य) देण्याची योजना आखली जात आहे.

या नवीन प्रस्तावाचा थेट परिणाम अशा विद्यार्थ्यांवर होईल, जे शालेय शिक्षणाकडे दुर्लक्ष करून केवळ कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या भरवशावर बसलेले असतात. सरकारच्या मते, या पावलामुळे केवळ शालेय पातळीवरील शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही, तर कोटा सारख्या शहरांमध्ये फोफावलेली महागडी कोचिंग संस्कृती आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणही कमी करता येईल. याच पार्श्वभूमीवर आज आपण शिक्षण मंत्रालयाचा नवीन प्लॅन काय आहे आणि तो सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत कसा बदल करणार आहे. हे जाणून घेणार आहोत.

शिक्षण मंत्रालयाचा नवा ‘वेटेज प्लॅन’ काय आहे?

सध्याच्या घडीला आयआयटी, एनआयटी किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२ वी बोर्डाचे गुण केवळ ‘पात्रता निकष’ (Qualifying Criteria – जसे की किमान ७५% किंवा ५०% गुण) म्हणून काम करतात. अंतिम गुणवत्ता यादी पूर्णपणे नीट किंवा जेईईच्या गुणांवर आधारित असते. परंतु, नवीन प्लॅननुसार आता एक अशी संयुक्त गुण पद्धत तयार करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्याच्या प्रवेश परीक्षेच्या गुणांसोबतच १२ वी बोर्डाच्या निकालाचीही एक निश्चित टक्केवारी जोडली जाईल.

आजकाल विद्यार्थी ११ वी आणि १२ वी मध्ये फक्त ‘डमी स्कूल्स’ मध्ये प्रवेश घेतात आणि दिवस-रात्र कोचिंग सेंटर्समध्ये घालवतात, याबद्दल सरकार अत्यंत गंभीर आहे. यामुळे नियमित शालेय शिक्षणाचे महत्त्व संपत चालले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, जेव्हा बोर्ड परीक्षांच्या गुणांना थेट अंतिम रँकिंगमध्ये वेटेज मिळू लागेल, तेव्हा विद्यार्थी पुन्हा शाळांकडे वळतील. यामुळे महागड्या कोचिंगची फी भरू न शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळेल.

Odisha school book: शालेय पुस्तकांमध्ये तब्बल १,६७८ चुका? NCERT च्या वादादरम्यान सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

गेल्या काही काळातील नीट परीक्षेबाबतचे वाद आणि पेपर लीकच्या प्रकरणांमुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, जर प्रवेशाचा आधार केवळ तीन तासांची परीक्षा नसून वर्षभरातील बोर्डाची कामगिरी असेल, तर एखाद्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणार नाही. बोर्ड परीक्षांचे गुण सेंट्रल सॉफ्टवेअरमध्ये आधीपासूनच सुरक्षित असतील, ज्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेची विश्वासार्हता अधिक मजबूत होईल.

नवीन नियम कधी आणि कसा लागू होऊ शकतो?

हा प्लॅन सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याच्या व्यावहारिक बाजू समजून घेण्यासाठी शिक्षण मंत्रालय विविध राज्यांचे शिक्षण बोर्ड, एनटीए (NTA) आणि आयआयटीच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने बैठका घेत आहे. देशात अनेक वेगवेगळे बोर्ड (जसे की CBSE, ICSE आणि राज्य बोर्ड) कार्यरत असून त्यांची गुणदान पद्धत वेगवेगळी आहे, हे या समोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे सर्वांना समान पातळीवर आणण्यासाठी एक ‘नॉर्मलायझेशन फॉर्म्युला’ (Normalization Formula) तयार करण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही.

Government Jobs: केंद्र सरकारी संस्थेत नोकरी हवीय? UGC च्या स्वायत्त संस्थेत ‘या’ पदांसाठी आजच अर्ज करा

Web Title: Neet jee merit list 12th board marks weightage education new rules dummy schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • education
  • JEE
  • NEET
  • new rules

संबंधित बातम्या

11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश सुरूच; राज्यात अकरावीच्या तब्बल ८.८५ लाख जागा रिक्त!
1

11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश सुरूच; राज्यात अकरावीच्या तब्बल ८.८५ लाख जागा रिक्त!

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!
2

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?
3

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय
4

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.