Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Jobs: केंद्र सरकारी संस्थेत नोकरी हवीय? UGC च्या स्वायत्त संस्थेत ‘या’ पदांसाठी आजच अर्ज करा

Government Jobs Delhi: केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत 'इंटर-युनिव्हर्सिटी एक्सिलेरेटर सेंटर' (IUAC) नवी दिल्ली येथे वैज्ञानिक, ज्युनियर इंजिनीअर आणि ग्रंथालय सहाय्यक पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ४ ऑगस्ट २०२६ ऑनलाईन अर्ज पूर्वी करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 04, 2026 | 12:53 PM
JOB

JOB

Follow Us
Follow Us:

IUAC government jobs:  जर तुम्ही सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) स्वायत्त संस्था असलेल्या ‘इंटर-युनिव्हर्सिटी एक्सिलेरेटर सेंटर’ (IUAC), नवी दिल्ली येथे विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

वैज्ञानिक-सी (Scientist-C): ५ पदे

ज्युनियर इंजिनीअर-सी (Junior Engineer-C): २ पदे

लायब्ररी असिस्टंट-सी (Library Assistant-C): १ पद

कोण करू शकते अर्ज?

वैज्ञानिक-सी: उमेदवाराकडे फिजिक्स (भौतिकशास्त्र) किंवा अप्लाइड फिजिक्समध्ये एमएससी (M.Sc) ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, इयत्ता १० वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा २६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

ज्युनियर इंजिनीअर-सी: या पदासाठी इलेक्ट्रॉनिक्समधील डिप्लोमा अनिवार्य आहे. उमेदवाराला १० वी मध्ये किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे.

लायब्ररी असिस्टंट-सी: या पदासाठी बीएससी (B.Sc) सोबतच बी.लिब. (B.Lib) ची पदवी आणि संगणकीकृत ग्रंथालयामध्ये (Computerized Library) किमान चार वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३४ वर्षे ठेवण्यात आली आहे.

पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) आकर्षक वेतन श्रेणी मिळणार आहे:

वैज्ञानिक-सी: पे-लेव्हल १० नुसार प्रतिमहिना ५६,१०० ते १,७७,५००

ज्युनियर इंजिनीअर-सी: पे-लेव्हल ६ नुसार प्रतिमहिना ३५,४०० ते १,१२,४००

लायब्ररी असिस्टंट-सी: पे-लेव्हल ६ नुसार प्रतिमहिना ३५,४०० ते १,१२,४००

Cheapest IIM in India: एमबीए करायचयं! मग ‘या’ सर्वात स्वस्त आयआयएम संस्थांबद्दल नक्की जाणून घ्या

निवड प्रक्रिया कशी असेल?

वैज्ञानिक-सी: या पदासाठी प्रथम लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.

ज्युनियर इंजिनीअर-सी आणि लायब्ररी असिस्टंट-सी: या पदांसाठी लेखी परीक्षेनंतर स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट घेतली जाईल.

अंतिम गुणवत्ता यादी उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल.

General vs Honours Degree: जनरल डिग्री आणि ऑनर्स कोर्समध्ये नेमका फरक काय? कॉलेजला प्रवेश घेण्यापूर्वी ‘हे’ गणित समजून घ्या

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार IUAC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जासाठी प्रथम नोंदणी (Registration) करावी लागेल, त्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी (Signature) अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागेल. एखाद्या पदासाठी अर्ज शुल्क लागू असल्यास, त्याचे पेमेंट देखील ऑनलाईन करावे लागेल.

Web Title: Iuac government jobs new delhi recruitment 2026 eligibility salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • education
  • Government Job
  • High salary Job
  • UGC

संबंधित बातम्या

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
1

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!
2

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
3

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
4

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.