Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET पेपरफुटीचे धागेदोरे कल्याणपर्यंत; म्हारळमधील विद्यार्थिनीची CBI कडून चौकशी

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर लीक प्रकरणाने परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का दिला. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून CBI विविध धागेदोरे तपासत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 10:35 AM
NEET ची फेरपरीक्षा होणार उद्या; परीक्षा केंद्रांवर असणार खडा पहारा, 35 प्रमुख शहरांमध्ये...

NEET ची फेरपरीक्षा होणार उद्या; परीक्षा केंद्रांवर असणार खडा पहारा, 35 प्रमुख शहरांमध्ये...

Follow Us
Follow Us:
  • वैद्यकीय प्रवेश परीक्षेची गोपनीयता धोक्यात आल्याने देशभरात मोठा वाद निर्माण झाला.
  • तपास यंत्रणांनी अनेक संशयितांच्या संपर्कांची आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू केली.
  • प्रकरणानंतर परीक्षा सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली.
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची धग आता कल्याणपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने कल्याणमधील म्हारळ परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Khan Sir Life Story: ४० रुपयांच्या कमाईपासून कोट्यवधींच्या मालकापर्यंत, कसा आहे खान सरांचा प्रवास?

शहरामध्ये विविध चर्चांना उधाण

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयच्या विशेष पथकाने संबंधित विद्यार्थिनीच्या घरी भेट देत तिचा जबाब नोंदवला. तपासात संशयितांच्या यादीत असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या कॉल डिटेल्स आणि संपकांची छाननी करताना या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर या संपर्काच्या आधारे सीबीआयचे पथक कल्याणमध्ये दाखल झाले आणि विद्यार्थिनीची सखोल चौकशी करण्यात आली. संबंधित विद्यार्थिनी आणि संशयित विद्यार्थी यांच्यातील संपर्काचे स्वरूप काय होते, त्याचा पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. या संदर्भात विद्यार्थिनीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या मुलीचा एका विद्यार्थ्यांसोबत संपर्क होता आणि त्याच कारणामुळे तिचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले, सीबीआय अधिकाऱ्यांनी घरी येऊन प्राथमिक चौकशी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनीचा थेट सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिची भूमिका केवळ संपर्कापुरती मर्यादित होती की, पेपरफुटी रॅकेटशी तिचा काही संबंध होता, याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सीबीआयच्या या कारवाईनंतर कल्याणमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CFA Institute Roundtable: फायनान्स क्षेत्रातील शिक्षणाचे भविष्य काय? सीएफए इन्स्टिट्यूटच्या गोलमेज परिषदेत नक्की काय चर्चा झाली?

नक्की काय घडलं होत?

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG) ही भारतातील सर्वात मोठी परिक्षा मानली जाते. विद्यार्थी वर्षभर भरपूर मेहनत घेऊन परिक्षेची तयारी करतात. ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या परिक्षेची प्रश्नपत्रिका आधीच लीक झाल्याची माहिती उघडकीस आली ज्यानंतर हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलं. पेपर कॅन्सल झाल्याने अनेक विद्यार्थांनी आत्महत्या केली तर पेपरफुटीच्या या प्रकरणात कुणाकुणाचा समावेश आहे याचा शोध घेतला जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Neet paper leak case cbi investigation reaches kalyan mharal student questioned over suspected contact link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • NEET
  • neet paper leak
  • trending

संबंधित बातम्या

NEET UG Result: ‘नीट’मध्ये ५०० पेक्षा कमी गुण मिळालेत? तरीही पूर्ण होऊ शकते डॉक्टरांचे स्वप्न; जाणून घ्या पर्याय
1

NEET UG Result: ‘नीट’मध्ये ५०० पेक्षा कमी गुण मिळालेत? तरीही पूर्ण होऊ शकते डॉक्टरांचे स्वप्न; जाणून घ्या पर्याय

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट
2

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral
3

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?
4

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.