फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Khan Sir Life Story: बिहारसह संम्पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले कोचिंग क्लासचे शिक्षक म्हणून खान सरांना ओळखले जाते.दरम्यान, त्यांच्या कोचिंग सेंटरवर झालेल्या गोळीबारमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कधीकाळी केवळ ४० रुपये कमावणारे खान सर आज कोट्यवधींचे मालक कसे बनले आणि फैजल खान यांचा ‘खान सर’ बनण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता.
फैजल खान ज्यांना खान सर या नावाने ओळखले जाते. ते स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात भारतातील सर्वात प्रभावशाली शिक्षकांपेैकी एक म्हणून उद्यास आले होते. पाटणा येथील त्यांची ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ ही संस्था यूपीएससी (UPSC), बीपीएससी (BPSC), एसएससी (SSC), रेल्वे आणि नीट (NEET)सारख्या सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेद्वारांसाठी एक प्रमुख केंद्र बनली आहे. आपली सोपी शिक्षण पद्धती आणि सहज विनोदबुद्धी यासाठी प्रसिद्ध असलेल्या खान सरांनी विद्यार्थ्यांशी एक घट्टनाते निर्माण केले आहे.
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात १९९३ मध्ये जन्मलेले खान सर हे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील आहेत. खान सरांचे वडील कंत्राटदार म्हणून काम करायचे तर त्यांची आई घरकाम करायच्या. खान सरांचे जीवन जनसेवेच्या माध्यमातून उत्तम भविष्य घडवण्याचे त्यांचे स्वप्न होते. इतर अनेक तरुण विद्यार्थ्यांप्रमाणे खान सरांचीही सेैन्यात भरती होण्याची इच्छा होती. त्यांनी हे ध्येय साध्य करण्यासाठी स्वत:ला समर्पित केले होते. मात्र, त्यांचे सेैन्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या करिअरची सुरवात केली.
फैजल खान यांनी सर्वात आधी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पॉलिटेक्निक संस्थांमध्ये अर्ज केला आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये प्रवेश मिळवण्याची प्रयत्न केला. परंतु, यापैकी कोणताही प्रयत्न यशस्वी झाली नाही. त्यानी नंतर अध्यापन क्षेत्राची निवड करुन शिक्षण क्षेत्रात आपला पाय भक्कम केला. त्यांच्या पहिल्या विद्यार्थ्यांने वर्गात पहिला क्रमांक मिळवल्याने इतर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी लोक त्यांच्याशी संपर्क साधू लागले. शिकवण्यास सुरुवात केल्यानंतरही त्यांना अर्थिक अडचणींचा सामोरे जावे लागत होते. एक वेळ अशी होती की, तासनतास शिकवल्यानंतर ही त्यांना फक्त रुपये मिळायची ही रक्कम ९० रुपयांच्या बस भाड्यासाठी पुरेशी नव्हती.
असे सांगितले जाते की, एक दिवस गंगा नदीच्या काठी बसून खान सरांनी स्वत:चे कोचिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रांच्या मदतीने त्यांनी एक छोटासा वर्ग सुरू केला पण एका रात्री त्यांच्या कोचिंग सेंटरवर बॉम्ब हल्ला झाला. पण त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. पुढे त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकप्रियता मिळू लागली. सध्या खान सरांचे ४४ दशलक्ष पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत.






