फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET PG 2026 Exam Guidelines: नीट पीजी २०२६ (NEET PG 2026) परीक्षेला आता फारसा वेळ उरलेला नाही. परीक्षेच्या तयारीसोबतच परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेबाबतही उमेदवारांच्या मनात अनेक प्रश्न असतात. विशेषतः संगणकावर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत अचानक वीज गेली, सिस्टीम लॉक झाली किंवा स्क्रीन आणि माउसमध्ये काही बिघाड झाला, तर काय करायचे? याबाबत नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
एनबीईएमएसच्या मते, परीक्षेदरम्यान कोणत्याही तांत्रिक समस्येबाबत उमेदवारांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून, तांत्रिक बिघाडामुळे उमेदवाराच्या ठरलेल्या वेळेचे नुकसान होणार नाही.
NBEMS द्वारे ३० ऑगस्ट २०२६ रोजी NEET PG २०२६ परीक्षा आयोजित केली जाईल. अधिकृत माहितीनुसार, या परीक्षेसाठी एकूण २,७३,१८३ उमेदवारांनी यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांनी अधिक आहे. ही परीक्षा सुमारे ३४० शहरांमध्ये आणि १३०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल.
जर उमेदवाराने परीक्षेत लॉगिन केले असेल आणि त्याच दरम्यान वीज गेली, तर उमेदवाराला स्वतःहून कोणतीही कृती करण्याची गरज नाही. एनबीईएमएसनुसार, वीज जाताच परीक्षेचा टायमर थांबेल. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर टायमर जिथे थांबला होता, तिथूनच पुन्हा सुरू होईल. म्हणजेच तांत्रिक समस्येमुळे उमेदवाराच्या परीक्षा वेळेत कोणतीही कपात केली जाणार नाही.
परीक्षेदरम्यान मुख्य सर्व्हरवरील कनेक्टिव्हिटी संपल्यामुळे जर उमेदवाराची मशिन लॉक झाली, तर परीक्षा केंद्राच्या प्रत्येक परीक्षा खोलीत उपस्थित असलेला आयटी मॅनेजर उमेदवाराचे अकाउंट व्हेरिफाय करून ते अनलॉक करेल. त्यानंतर उमेदवाराने जिथे परीक्षा सोडली होती, त्याच वेळेपासून परीक्षेचा टायमर पुन्हा सुरू होईल.
जर उमेदवाराच्या सिस्टीममध्ये स्क्रीन फ्लिकर होणे, माउसमध्ये अडचण येणे, सिस्टीम वारंवार लॉक किंवा हँग होणे यांसारख्या काही विशिष्ट समस्या येत असतील, तर याची माहिती तात्काळ सुपरव्हायझरला द्यावी लागेल. एनबीईएमएसनुसार, तक्रार मिळाल्यानंतर आयटी मॅनेजर किंवा इनव्हिजिलाइट्र उमेदवाराची मशिन व्हेरिफाय करून लॉक करेल. गरज भासल्यास उमेदवाराला त्याच लॅबमध्ये किंवा इतर लॅबमधील बफर सीटवर हलवले जाऊ शकते.
NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!
अधिकृत माहितीनुसार, NEET PG २०२६ साठी परीक्षा केंद्रांची आधीच सीलिंग आणि पडताळणी, सीसीटीव्ही (CCTV) निगराणी, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन, उमेदवारांची फ्रिस्किंग आणि सिग्नल जॅमर यांसारख्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. याशिवाय, डायनॅमिक कॉम्प्युटर्स, केंद्रीय आणि प्रादेशिक कमांड सेंटरद्वारे लाइव मॉनेटरिंग तसेच स्वतंत्र निरीक्षक (Observers) आणि अप्रेझर्सची रिअल-टाइम निगराणी या परीक्षा व्यवस्थेचा एक भाग असेल.






