Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Success Story: नीट यूजी परीक्षेपूर्वी मुलाचा मृत्यू, वडिलांनी दिली परीक्षा अन् आता ते बनणार डॉक्टर

Sunil Lohar NEET Success Story 2026: ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू आणि बिकट आर्थिक परिस्थितीशी लढा देत राजस्थानच्या कचरा वेचणाऱ्या सुनील लोहारने नीट परीक्षेत ५६८० वी रँक मिळवत यश संपादन केले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 22, 2026 | 09:41 AM
RAJASTHAN

RAJASTHAN

Follow Us
Follow Us:

Sunil Lohar NEET Success Story Rajasthan Sikar 2026: नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी री-एग्जामचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये नीट परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा समोर येत आहेत. अशीच एक यशाची कहाणी राजस्थानमध्ये राहणाऱ्या सुनील लोहार या तरुणाची आहे, ज्याने आपल्या अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाला गमावल्याच्या दुःखाने त्याला काही काळासाठी थांबवले होते. त्यावेळी त्याची हिम्मत तुटली होती, तो आतून खचला होता; पण या सर्व परिस्थितींशी लढा देऊन त्याने स्वतःला पुन्हा नीट परीक्षेसाठी तयार केले. आपल्या विखुरलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्याने स्वतःशीच संघर्ष केला आणि आज त्याने नीट परीक्षा पास केली आहे. चला तर मग, सुनील लोहारची ही प्रेरणादायी यशोगाथा जाणून घेऊया.

पुस्तक उचलण्याच्या वयात जबाबदाऱ्यांचे ओझे

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील रींगस या छोट्या शहरात राहणारा सुनील लोहार एका अतिशय गरीब कुटुंबातील आहे. लहान वयातच त्याच्या खांद्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्या होत्या आणि आयुष्यातील संघर्षातून मार्ग काढत त्याने यशाची पायरी गाठली. ज्या समाजात त्याचा जन्म झाला, तिथे भंगार गोळा करण्याचे काम केले जायचे. त्यामुळे तो स्वतः घरोघरी जाऊन भंगार गोळा करायचा.

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये ऑफिसर पदांची मोठी भरती! ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची सुवर्णसंधी

अभ्यासासोबत वडिलांना करायचा मदत

लहानपणापासूनच त्याने वडिलांना भंगार आणि लोखंड गोळा करून आणताना पाहिले होते. भंगाराचा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात सुरुवातीपासूनच केला जात होता. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर सुनीलही वडिलांसोबत कामावर जायचा. परंतु, लहानपणापासूनच त्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाच्या आड कुटुंबाची गरिबी आणि बिकट आर्थिक परिस्थिती येत होती. १२ वीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याला वडिलांसोबत भंगार गोळा करण्याचे काम करावे लागले. वडिलांनी त्याचा अभ्यास थांबवला होता, परंतु त्याने जिद्दीने आणि संघर्षाने पुन्हा पुस्तके हातात घेतली.

नीट परीक्षेच्या तयारीदरम्यान दुःखाचा डोंगर

कशीबशी १२ वीची अभ्यास पूर्ण करून जेव्हा सुनीलने नीट परीक्षेची तयारी सुरू केली आणि परीक्षेचे दिवस जवळ आले, तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या ६ महिन्यांच्या बाळाचा एका आजारपणामुळे मृत्यू झाला. या अथांग दुःखातून स्वतःला सावरून त्याने डॉक्टर बनण्याच्या आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि नीट यूजी परीक्षा दिली.

US Green Card: अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! ग्रीन कार्डसाठी मोजावे लागणार तब्बल ९६ लाख रुपये; ट्रम्प सरकारचा नवा प्लॅन

५६८० व्या रँकसह नीट परीक्षेत देदीप्यमान यश

आपल्या बाळाला गमावल्याचे दुःख व्यक्त करण्यासाठी सुनील फक्त एका दिवसासाठी घरी गेला होता, परंतु लगेचच तो परत अभ्यासाला निघून गेला आणि त्याने मोबाईल फोनपासूनही पूर्ण अंतर ठेवले. कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याने नीट परीक्षा देण्याचा ठाम निर्णय घेतला. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी परीक्षेत तो सहभागी झाला होता. या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून ऑल इंडिया रँक ५६८० मिळवून त्याने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्याची ही यशोगाथा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरू शकते.

Web Title: Neet success story sunil lohar ragpicker doctor rank 5680 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • inspiration
  • NEET
  • Student

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
2

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
3

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ
4

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.