
अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; मनमाडमध्ये हळहळ
मनमाड : अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळील वागदर्डी धरणात बुडून राहुल सोमासे याचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये राहून परीक्षेची तयारी करणारा राहुल दसऱ्याच्या सणानिमित्त गावी आला होता. मात्र, बैलाला पाण्यात पोहण्यासाठी नेत असताना घडलेल्या दुर्घटनेत त्याचा जीव गेला. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सोमासे हा गरीब कुटुंबातील होतकरू तरुण होता. शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिल्लीत राहून UPSC परीक्षेची तयारी करत होता. दसऱ्याचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी तो अलीकडेच आपल्या गावी परतला होता. दरम्यान, राहुलच्या चुलत्याने घरातील आजारी बैलाला पाण्यात पोहण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार राहुल आपल्या चुलत भावासोबत बैलाला घेऊन मनमाडजवळील वागदर्डी धरणावर गेला.
बैलाला पाण्यात पोहण्यासाठी नेत असताना राहुलला धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. अधिकारी होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राहुलने भविष्यात अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, दसऱ्याच्या सुट्टीत घडलेल्या या दुर्घटनेने त्याच्या स्वप्नांचा दुर्दैवी अंत झाला. राहुलच्या निधनाने सोमासे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Ans: राहुल सोमासे हा २५ वर्षीय तरुण होता. तो दिल्लीत राहून UPSC परीक्षेची तयारी करत होता.
Ans: मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात बुडून त्याचा मृत्यू झाला.
Ans: घरातील आजारी बैलाला पाण्यात पोहण्यासाठी नेण्याकरिता तो चुलत भावासोबत धरणावर गेला होता.