Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

MCC Round 1 Result : NEET UG 2026 प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या जागावाटपाचा निकाल मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने (MCC) जाहीर केला आहे. या फेरीत MBBS आणि BDSसह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण 29,945 जागांचे वाटप करण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 11:15 AM
NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • NEET UG 2026 Round 1 चा तात्पुरता सीट अलॉटमेंट निकाल जाहीर.
  • MBBS आणि BDSच्या 29,945 जागांचे वाटप करण्यात आले.
  • निकालातील त्रुटींसाठी MCCचे Grievance Portal खुले.
MCC Round 1 Result 2026 College: NEET UG 2026 च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने म्हणजेच MCC ने पहिल्या फेरीतील तात्पुरत्या जागा वाटपाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अभासक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रम आणि कॉलेज मिळाले आहे ते पाहता येईल.

पहिल्या फेरीत एमबीबीएस आणि बीडीएससह विविध वैद्यकीय जागांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फेरीत एकूण २९,९४५ एमबीबीएस आणि बीडीएस जागांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

निकाल कसा पाहावा…

  • https://mcc.nic.in/ अधिकृत वेबसाईटवर जा…
  • लॉगिन केल्यावर NEET UG चा रोल नंबर आणि पासवर्ड टाकावा
  • त्यानंतर स्क्रीनवर विद्यार्थ्याच्या नावावर झालेल्या जागा वाटपाची माहिती तपासा
  • कॉलेजचे नाव, निवडलेला अभ्यासक्रम आणि इतर संबंधित तपशील काळजीपूर्वक वाचा
  • निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी लगेच घाईने पुढचा निर्णय घेऊ नये.
  • सर्व माहिती नीट वाचून आपल्याला मिळालेले कॉलेज आणि कोर्स योग्य आहेत का, हे तपासावे.
  • पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले वाटप पत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवणेही उपयोगाचे ठरेल.
  • पुढील टप्प्यांमध्ये हे कागदपत्र आवश्यक पडू शकते.

तात्पुरत्या निकालाची पडताळणी का महत्त्वाची?

MCC ने विद्यार्थ्यांना तात्पुरत्या जागा वाटपाच्या निकालातील काही चुका असतील तर त्याचा सांगण्याची संधी दिली आहे. निकालात नाव, कॉलेज, अभ्यासक्रम किंवा इतर कोणत्याही तपशिलाबाबत काही गडबड दिसल्यास त्वरित समितीच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता संबंधित माहिती तपासावी. मुदत संपल्यानंतर तक्रार करण्याची संधी मिळेलच असे नाही.

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल

दरम्यान, पहिल्या फेरीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे. अंतिम जागा वाटप झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. कागदपत्रे, शुल्क आणि इतर प्रवेशाशी संबंधित नियमांची माहिती आधीच घेणे योग्य ठरेल.

जागा न मिळालेल्यांनी निराश होऊ नये

पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले नाही म्हणून विद्यार्थ्यांनी निराश होण्याची गरज नाही. समुपदेशनाच्या नियमानुसार पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी कायम असते. पुढील फेरीत उपलब्ध जागांनुसार विद्यार्थी पुन्हा पसंतीक्रम देऊ शकतात. विशेष म्हणजे, पुढील फेरीत काही जागा रिक्त राहिल्यास किंवा उपलब्ध झाल्यास त्यावर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळू शकते. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षेप्रमाणे न लागलेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

NEET UG प्रवेश प्रक्रिया अनेक टप्प्यांतून पुढे जाते. त्यामुळे प्रत्येक तारखेची आणि सूचनेची माहिती वेळेवर तपासणे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. अधिकृत माहितीसाठी MCC च्या वेबसाइटवरील सूचना पाहाव्यात आणि कोणतीही महत्त्वाची अंतिम तारीख चुकणार नाही याची काळजी घ्यावी.

Web Title: Neet ug 2026 round 1 seat allotment result out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Career News
  • Marathi News
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव
1

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी
2

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
3

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
4

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.