Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई! मराठीचा समावेश न केल्यास मान्यता रद्द- मंत्री भूसे

राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. शाळांमध्ये मराठी शिकवली जात नसल्यास तक्रार आल्यावर सरकारकडून तत्काळ चौकशी केली जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 14, 2026 | 04:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीने शिकवला जावा, यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी आढळल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट घोषणा शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांनी शुक्रवारी केली.

Architecture बनण्यासाठी काय करावे? ‘या’ क्षेत्रात घडवा करिअर

राज्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. यामध्ये राज्य मंडळासह खासगी, विनाअनुदानित तसेच विविध परकीय मंडळांच्या शाळांचाही समावेश आहे. कोणतीही शाळा या नियमापासून अपवाद राहणार नसल्याचे मंत्री भुसे यांनी सभागृहात स्पष्ट केले. मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्यास त्याची तत्काळ चौकशी केली जाईल. तपासात संबंधित शाळेत मराठी शिकवली जात नसल्याचे आढळल्यास प्रथम त्या संस्थेला सूचना देण्यात येतील. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असल्यामुळे तिचे संवर्धन आणि प्रसार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नवीन पिढीला मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि राज्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा व संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. मराठी भाषा शिकवणे हा नियम केवळ सरकारी शाळांसाठी मर्यादित नसून राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना तो लागू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील पूर्व-प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतही सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी आणि बालवाडी केंद्रांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून लहान मुलांना अधिक दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर खासगी पूर्व-प्राथमिक केंद्रांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. २४ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व खासगी पूर्व-प्राथमिक शिक्षण केंद्रांनी नोंदणी पोर्टलवर आपली माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या व्यवस्थेमुळे राज्य, जिल्हा प्रशासन तसेच पालकांना या केंद्रांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची माहिती शासनाच्या नोंदणीत उपलब्ध झाल्यास शिक्षण व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असेही सांगण्यात आले.

राज्यातील हजारो तरुणांना मिळणार रोजगार! 21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला गती

मराठी विषयाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असून या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मंत्री भुसे यांनी ठामपणे नमूद केले. ज्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याचे आढळेल, त्या शाळांना प्रथम समज देण्यात येईल आणि नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील. मात्र तरीही आदेशांचे पालन न केल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सुनिश्चित होणार असून विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा, संस्कृती आणि परंपरेची अधिक चांगली ओळख मिळण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: New ruled by dada bhuse action to be taken against schools that fail to teach marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • education
  • Education Department
  • Marathi Schools

संबंधित बातम्या

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
1

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

ऐतिहासिक! 10 वी अन् 12 वीच्या परीक्षेत १०३ कर्मचारी निलंबित; Education Department ची धडक कारवाई
2

ऐतिहासिक! 10 वी अन् 12 वीच्या परीक्षेत १०३ कर्मचारी निलंबित; Education Department ची धडक कारवाई

मराठी शाळा दाखवून इंग्रजीचा खेळ? सेनगावातील शाळेवर ५ कोटींच्या निधी गैरव्यवहाराचा आरोप
3

मराठी शाळा दाखवून इंग्रजीचा खेळ? सेनगावातील शाळेवर ५ कोटींच्या निधी गैरव्यवहाराचा आरोप

CBSE चा नवा नियम! कॉपी कराल तर पास होणे अशक्यच; विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा निर्णय
4

CBSE चा नवा नियम! कॉपी कराल तर पास होणे अशक्यच; विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.