Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NHPC लिमिटेडमध्ये २४८ नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत अर्जाची संधी

एनएचपीसी लिमिटेडने नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी २४८ जागांची भरती जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 28, 2025 | 04:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारत सरकारच्या मालकीची असलेली नवरत्न कंपनी  एनएचपीसी लिमिटेड (NHPC Limited) ही देशातील अग्रगण्य जलविद्युत निर्मिती करणारी कंपनी असून जल, सौर, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या प्रकल्पांमध्येही कार्यरत आहे. कंपनीने नुकतीच नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून यामध्ये एकूण २४८ पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीमध्ये असिस्टंट राजभाषा ऑफिसरसाठी ११ पदे, ज्युनिअर इंजिनिअरसाठी (सिव्हिल १०९ पदे, इलेक्ट्रिकल ४६, मेकॅनिकल ४९, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन १७ पदे), सीनिअर अकाउंटंटसाठी १० पदे, सुपरवायझर (आयटी)साठी १ पद, तसेच हिंदी ट्रान्सलेटरसाठी ५ पदे यांचा समावेश आहे.

बँक ऑफ बडोदा LBO पदासाठी ऍडमिट कार्ड जाहीर! अशा प्रकारे करा डाउनलोड

शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी पदव्युत्तर (हिंदी/इंग्रजी), इंटर सीए/सीएमए, डिप्लोमा (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन) तसेच बीसीए/बीएस्सी (आयटी) अशा अर्हता मागवण्यात आल्या आहेत. काही पदांसाठी आवश्यक अनुभवाची अट देखील ठेवण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून १ ऑक्टोबर २०२५ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर nhpcindia.com या Career Section मध्ये भेट द्यावी लागणार आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज करताना उमेदवारांनी आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, सही आणि संबंधित शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ७०८ रुपये निश्चित करण्यात आले आहे, तर एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क नाही.

वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ ऑक्टोबर २०२५ रोजी १८ ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांनुसार राखीव वर्गांना सवलत देण्यात येईल. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी यांच्या आधारे केली जाणार आहे.

आधी UPSC मग लग्न! पतीसह पत्नीही सिव्हिल अधिकारी; यश मिळण्याआधी केले डेट मग जोडले आयुष्यभरचे नाते

स्टेबल करिअरची संधी

एनएचपीसी ही जलविद्युत प्रकल्पांबरोबरच सौर, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात सक्रिय असल्याने उमेदवारांना दीर्घकालीन व स्थिर करिअर घडवण्याची सुवर्णसंधी या भरतीतून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी नियोजित मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Nhpc non executive recruitment in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • Job
  • Recruitment News

संबंधित बातम्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या
1

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती; बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी
2

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती; बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार, सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या कुठे आणि कसा कराल अर्ज
3

1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार, सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या कुठे आणि कसा कराल अर्ज

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ७० हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
4

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ७० हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.