फोटो सौजन्य - सोशल मिडिया
प्रेमविवाह आजकाल अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. आजकालच्या मुलांना जोडीदार शोधून देण्याची गरज नाही, एकमेकांच्या सहवासात तेच त्यांचा जोडीदार शोधून घेतात. अशीच काहीसी कथा IAS अधिकारी तुषार सिंगल आणि IPS अधिकारी नवजोत सिमीची आहे. २०२० मध्ये दोघांचे लग्न पार पडले. दोघेही सिव्हिल अधिकारी म्हणून मोठ्या पदांवर कामाला! काय आहे यांची संघर्षगाथा… वाचा.
तुषार आधी IIT दिल्लीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेत होते. त्यांनी तेथे त्यांचे ग्रॅजुएशन पूर्ण केले. त्यांनतर JNU मधून पुढील शिक्षण पूर्ण करत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सुरुवात केली. २०१३ मध्ये त्यांचे पहिले प्रयत्न फसले पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी २०१४ मध्ये RANK AIR 86 प्राप्त केले आणि IAS अधिकारी झाले. नवजोत मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत होत्या. त्यांनी २०१७ मध्ये RANK AIR 735 ने UPSC प्राप्त केली आणि IPS अधिकारी झाल्या. IAS तुषार सिंगल आता पश्चिम बंगालमध्ये SDO पदी कार्य सांभाळत आहेत तर त्यांनी DO म्हणूनही कार्य केले आहे. IPS नवजोत यांनी ACP पटना म्हणूनदेखील भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्याकडे विविध जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचाही मोठा अनुभव आहे.
दोघांची प्रेमकथा…
सोशल मीडियावर IAS तुषार आणि IPS नवजोत सिमी यांची प्रेमकथा लोकांना प्रचंड आवडत आहे. दोघांची भेट UPSC ची तयारी करत असताना झाली होती. ते दोघेही पंजाबचे रहिवासी असून कोचिंगदरम्यान त्यांची ओळख झाली. सिव्हिल सेवा क्षेत्रात समान ध्येय असल्याने त्यांच्यात जवळीक वाढली. बराच काळ त्यांनी एकमेकांना डेट केले आणि जेव्हा दोघेही UPSC परीक्षेत यशस्वी झाले तेव्हा लग्नाचा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी 2020 रोजी IAS तुषार आणि IPS नवजोत यांनी विवाह केला. त्यांच्या यशस्वी वैवाहिक आयुष्याच्या मागे एकमेकांना दिलेला आधार आणि विश्वास ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.