NIT गोवामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे.गैर शिक्षक पदासाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्चपासून या भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या संपूर्ण लेखाचा आढावा घ्या.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) गोवा यांनी अधिकृतपणे गैर-शिक्षक पदभरती 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे. संस्थेत विविध विभागांमध्ये अनेक गैर-शिक्षक पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवार अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीच्या टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. २८ मार्च २०२५ रोजी या भरती संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तर उमेदवारांना २८ मार्च २०२५ पासून अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी शेवटची तारीख २७ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात परीक्षा घेण्यात येणार आहे, परंतु तारीख अद्याप निश्चित नाही आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल. प्रथम सर्व उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर काही विशिष्ट पदांसाठी कौशल्य चाचणी किंवा व्यवसाय चाचणी घेण्यात येईल. काही पदांसाठी अंतिम मुलाखतही घेतली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल, त्यानंतर अंतिम नियुक्ती दिली जाईल. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी प्रथम nitgoa.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर “Non-Teaching Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करून अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांना नोंदणी करून अर्ज भरावा लागेल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि शुल्क भरल्यानंतर अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सादर करावा.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या रक्कमेत सूट देण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ग्रुप A पदासाठी अर्ज करताना १००० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर ग्रुप B अँड C पदासाठी अर्ज करताना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. इतर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ग्रुप A पदासाठी अर्ज करताना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना Group B & C पदासाठी ही रक्कम २५० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचनेतील सर्व अटी आणि पात्रता निकष तपासून पाहावेत. तसेच निवड प्रक्रियेसाठी पूर्ण तयारी करावी. या भरती प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांना सरकारी संस्थेत नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे सुनिश्चित करावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.