Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NRI Quota New Rules : CET Cell चा मोठ दणका! शासनाने नियमात बदल केले अन्… NRI कोट्यातील प्रवेशसंख्येत लक्षणीय घट

NRI Quota New Rules: Cet Cell ने एक मोठी निर्णय घेतला आहे. एनआरआयच्या नियमात मोठा बदल केला आहे. यामुळे व्यावसायिक अभ्याक्रमांच्या प्रवेशसंख्येत मोठी घट झाली आहे. ४५४ वरुन आकडा थेट ३४ वर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 05:10 PM
NRI Quota New Rules

NRI Quota New Rules

Follow Us
Follow Us:
  • NRI कोट्यातील प्रवेशात मोठी घसरण
  • नियम बदलताच आकडेवारी थेट ४५४ वरुन ३४ वर
  • चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशसंख्या घटली
सोनाजी गाढवे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एनआरआय विद्यार्थ्यांना प्रवर्गातून प्रवेश दिले जातात. मात्र, एनआरआय अर्थात अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत राज्य शासनाने केलेल्या बदलानंतर चालू शैक्षणिक वर्षात एनआरआय प्रवर्गातील प्रवेशसंख्येत मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४-२५ या वर्षात ४५४ विद्यार्थ्यांनी एनआरआय कोट्यातून प्रवेश घेतला होता, तर २०२५-२६ या वर्षात ही संख्या थेट ३४ वर आली आहे. अशी माहीती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

Big Breaking: 21 जून रोजी होणार NEET UG Re Exam, तारखेची झाली घोषणा

नियमांमध्ये सुधारणा अन्..

सीईटी सेलच्या निदर्शनास एनआरआय प्रवर्गातील प्रवेश प्रक्रियेत काही अनियमितता आल्याने शासनाने एनआरआयच्या व्याख्येत सुधारणा केली. याआधी नातेसंबंध आणि पालकत्वाच्या निकषांमध्ये असलेल्या संदिग्धतेमुळे अनेक उमेदवारांना या प्रवर्गाचा लाभ मिळत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर शासनाने नव्याने स्पष्ट नियम लागू केले आहेत.

नवीन नियमांनुसार उमेदवार स्वतः अनिवासी भारतीय असणे किंवा तो अनिवासी भारतीयाचा मुलगा अथवा मुलगी असणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच संबंधित भारतीय दूतावासाकडून त्याबाबत प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय पालकत्व कायद्यानुसार न्यायालयाने मान्यता दिलेल्या पालकांनाच एनआरआय पालक म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. न्यायालयीन आदेशाशिवाय इतर कोणत्याही पालकत्वाचा दावा स्वीकारला जाणार नाही.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एनआरआय प्रवर्गातून एकूण ३५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामध्ये बी.ई./बी.टेकसाठी २१४, बीडीएससाठी ४, बी.एडसाठी १, एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ३, एलएलबी पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी १६, एमबीएसाठी १, एमबीबीएससाठी १, पीजीडी अभ्यासक्रमासाठी ४ तसेच पीजीएम अभ्यासक्रमासाठी ११२ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

त्यानंतर २०२४-२५ मध्ये एनआरआय प्रवेशसंख्या वाढून ४५४ वर पोहोचली होती. त्यात बी.ई./बी.टेक अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक ४२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तसेच एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ६, एलएलबी पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी २३ आणि एमबीएसाठी १ विद्यार्थ्याने प्रवेश घेतला होता.

मात्र, २०२५-२६ या वर्षात सुधारित व्याख्या लागू झाल्यानंतर एनआरआय कोट्यातील प्रवेशसंख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. यावर्षी बी.ई./बी.टेकसाठी २७, एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी १, एलएलबी पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी ४ तसेच इतर अभ्यासक्रमासाठी १ अशा एकूण केवळ ३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एनआरआय पात्र विद्यार्थ्यांना संधी

एनआरआय संज्ञेतील संभ्रम दूर झाला असून केवळ पात्र आणि खऱ्या एनआरआय विद्यार्थ्यांनाच या प्रवर्गाचा लाभ मिळत असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एनआरआय व्याख्येतील बदलामुळे अपात्र उमेदवारांना आळा बसला असून प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता वाढल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, प्रवेशसंख्येतील मोठी घट ही नवीन नियमांच्या कठोर अंमलबजावणीचे द्योतक असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

वर्ष NRI विद्यार्थ्यांची संख्या
२०२३-२४ ३५६
२०२४-२५ ४५४
२०२५-२६ ३४

NTA Exam 2026: 21 जूनला परीक्षा; अ‍ॅडमिट कार्ड जारी होण्याची शक्यता कधी? NTA ने दिली महत्त्वाची माहिती

Web Title: Nrl quota new rules addmissions drops after change maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam
  • Marathi News

संबंधित बातम्या

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल
1

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
2

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज
4

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.