
Image
JEE Main 2027 Correction Alternative: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जेईई मेन २०२७ सत्र १ बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. जेईई मेनचा फॉर्म भरताना विद्यार्थी घाईघाईत नाव, स्पेलिंग प्रवर्ग किंवा पात्रता यांसारखी माहिती चुकीची भरतात. मात्र आता एनटीएने नवीन फॉर्म भरण्याची परवानगी दिल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. एनटीएच्या नोटीसनुसार, उमेदवारांना आता आधी मिळालेला अर्ज क्रमांक किंवा भरलेली फीस असूनही जेईई मेन २०२७ साठी फ्रेश अर्ज सादर करता येईल. नवीन फॉर्म केवळ २२ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) भरता येईल. लेट फीससह २३ ते २६ नोव्हेंबरपर्यंत भरता येईल. जुन्या फॉर्मची फीस रिफंड किंवा एडजस्ट केली जाणार नाही. केवळ फीससह कन्फर्म झालेला फॉर्मच वैध मानला जाईल. त्यामुळे या नव्या अपडेटबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन २०२७ सत्र १ साठी अर्ज करणाऱ्यांची सर्वात मोठी अडचण सोडवली आहे. अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना घाईघाईत वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता किंवा परीक्षा शहर निवडताना चुका होतात. आधी अशा परिस्थितीत करेक्शन विंडोशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नव्हता. पण आता एनआयएने (NTA) स्पष्ट केले आहे की, जर अर्जात कोणतीही मोठी गडबड झाली असेल, तर तुम्ही नवीन आणि फ्रेश अर्ज पुन्हा सादर करू शकता.
नवीन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो की त्यांचे दोन्ही फॉर्म मान्य असतील का? येथे एनटीएचा नियम अगदी स्पष्ट आहे. तुम्ही जितके फॉर्म सादर केले असतील, त्यापैकी केवळ तोच शेवटचा फॉर्म वैध मानला जाईल, ज्यासाठी फीस जमा केली गेली आहे आणि कन्फर्मेशन पेज जनरेट झाले आहे. जर नवीन फॉर्म भरायला सुरुवात तर केली पण पेमेंट किंवा कन्फर्मेशन पूर्ण करू शकला नाहीत, तर आधी भरलेला फॉर्मच वैध मानला जाईल. प्रत्येक नवीन फॉर्मसोबत नवीन अर्ज क्रमांक मिळेल. त्यामुळे जुन्या आणि नवीन क्रमांकामध्ये कन्फ्यूज होऊ नका.
लक्षात ठेवा की नवीन फॉर्म भरल्याने तुमचे जुने पैसे वाचणार नाहीत. एनटीयाच्या नियमांनुसार, जुन्या फॉर्मवर भरलेली परीक्षा फीस रिफंड केली जाणार नाही. जुनी फीस नवीन अर्जात एडजस्टही केली जाणार नाही. याचा अर्थ असा की, नवीन फ्रेश फॉर्मसोबत संपूर्ण परीक्षा शुल्क पुन्हा भरावे लागेल. जेईई मेन फॉर्म भरण्याआधी सर्व तपशील क्रॉस-चेक करून घ्या. एकाच सत्रासाठी एकापेक्षा अधिक अर्ज क्रमांकावरून परीक्षा देण्याला ‘अनफेअर मीन्स’ (UFM) मानले जाईल. याविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.
जेईई मेन २०२७ सत्र १ साठी फ्रेश अर्ज सादर करण्याची आणि फीस भरण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. या डेडलाइन चुकल्यास तरीही चिंतेचे कारण नाही. एनटीएने २३ ते २६ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) लेट फीससह अर्ज करण्याची संधी दिली आहे. जर फॉर्ममध्ये केवळ किरकोळ सुधारणा करायचे असतील, तर एनटीएने २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत विशेष करेक्शन फॅसिलिटी विंडो देखील उघडली आहे.
जेईई मेनचा फ्रेश फॉर्म भरताना सुरुवातीपासून सर्व प्रक्रिया पुन्हा पूर्ण करावी लागेल. याचा अर्थ असा की नाव, पात्रता, पत्त्यासह नवीन फोटोग्राफ, स्वाक्षरी (Signature) आणि सर्व आवश्यक कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागतील. कोणतीही तांत्रिक मदत किंवा संभ्रमाची स्थिती असल्यास एनटीएच्या हेल्पडेस्क नंबरवर (011-40759000 / 011-69227700) सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत संपर्क साधू शकता किंवा २४ तास उपलब्ध टोल-फ्री हेल्पलाइन (1800 180 4747) ची मदत घेऊ शकता.
Ans: विना लेट फीस नवीन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० पर्यंत) आहे, तर लेट फीससह २३ ते २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल.
Ans: नाही. जुन्या फॉर्मवर भरलेली परीक्षा फीस रिफंड किंवा नवीन अर्जात एडजस्ट केली जाणार नाही, नवीन अर्जासाठी संपूर्ण शुल्क पुन्हा भरावे लागेल.
Ans: तुम्ही सादर केलेल्या अर्जांपैकी केवळ तोच शेवटचा फॉर्म वैध मानला जाईल ज्यासाठी फीस यशस्वीरित्या भरली गेली आहे आणि कन्फर्मेशन पेज जनरेट झाले आहे.