Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्व खासगी आणि डीम्ड विद्यापीठांचे देशव्यापी ऑडिट करण्याचे आदेश! कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह

सर्व संबंधित संस्थांना निश्चित कालावधीत अहवाल सादर करण्यास सांगितले असून या चौकशीचे परिणाम उच्च शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी ठरणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 04:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • शेकडो विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
  • प्रशासकीय प्रामाणिकपणाची तपासणी करण्याचे निर्देश
  • सर्व संबंधित संस्थांना निश्चित कालावधीत अहवाल सादर करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व खासगी आणि डीम्ड विद्यापीठांविरुद्ध अभूतपूर्व पाऊल उचलत संपूर्ण देशव्यापी ऑडिट करण्याचे आदेश दिले असून, या निर्णयामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अॅमिटी विद्यापीठातील विद्यार्थिनी आयेशा जैन हिने केलेल्या याचिकेतून सुरुवात झालेल्या या प्रकरणाने एका विद्यार्थिनीच्या तक्रारीपासून थेट देशातील शेकडो विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयेशा जैनने कायदेशीररित्या नाव बदलल्यानंतरही तिला विद्यापीठ प्रशासनाने वर्गात प्रवेश देण्यास नकार दिला, मानसिक दबाव आणला आणि तिला अनावश्यक त्रास दिल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण केवळ विद्यार्थी हक्कांचे वाटत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने त्याकडे उच्च शिक्षण क्षेत्रातील व्यापक गैरव्यवहारांचे संकेत म्हणून पाहिले.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्व-संरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थिंनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) सर्व खासगी व डीम्ड विद्यापीठांची सविस्तर माहिती मागवली आहे. यामध्ये विद्यापीठे कशी स्थापन झाली, त्यांची मालकी कोणाकडे आहे, व्यवस्थापनात कोण सहभागी आहे, त्यांच्याकडे आवश्यक नियामक परवानग्या आहेत का, तसेच ही विद्यापीठे कायद्यानुसार ‘ना-नफा संस्था’ म्हणून काम करतात का यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत. न्यायालयाने विशेषतः विद्यापीठांना मिळालेली जमीन, कुलगुरू व इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती, आर्थिक निर्णय, प्रवेशाची पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण आणि प्रशासकीय प्रामाणिकपणाची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक विद्यापीठांच्या कारभारावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

यूजीसीवरही न्यायालयाने कठोर भूमिका घेतली असून, UGC अध्यक्ष तसेच केंद्र व राज्यांच्या मुख्य सचिवांकडून वैयक्तिक जबाबदारी मागवली आहे. एका वरिष्ठ UGC अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, विद्यापीठे नियमानुसार चालत आहेत की नाही, याबाबत अनेक वर्षांपासून त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे हे पाऊल उच्च शिक्षण व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची महत्त्वाची संधी आहे. आयेशा जैनच्या प्रकरणात UGC ने विद्यापीठाला तिच्या नाव बदलण्याच्या विनंतीचा पुनर्विचार करण्याची सूचना केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या देशात ४३२ खासगी आणि १२७ डीम्ड विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात संस्थांचे ऑडिट होणे ही स्वतःमध्ये एक ऐतिहासिक कारवाई ठरत आहे.

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचा नवा दृष्टिकोन! भविष्यात विद्यापीठ निर्मितीचा विचार केला जाहीर

न्यायालयाने सर्व संबंधित संस्थांना निश्चित कालावधीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतरच्या निष्कर्षांवरून अनेक विद्यापीठांच्या मान्यतांवर, परवानग्यांवर आणि प्रशासकीय रचनेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा पुनर्विचार करण्यासाठी हा निर्णय पुढील काही महिन्यांत महत्वाचा ठरणार आहे.

Web Title: Orders to conduct a nationwide audit of all private and deemed universities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० देशाच्या भविष्यासाठी पूरक! मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका
1

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० देशाच्या भविष्यासाठी पूरक! मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका

Washim News: कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी! प्रत्येक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक
2

Washim News: कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी! प्रत्येक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक

जवळा बाजार जि.प. शाळेत शिक्षकाची जागा रिक्त; ४ वर्गांसाठी ३ शिक्षक, पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा
3

जवळा बाजार जि.प. शाळेत शिक्षकाची जागा रिक्त; ४ वर्गांसाठी ३ शिक्षक, पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती
4

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.