फोटो सौजन्य - Social Media
चेंदणी रोड कॅम्पस, ज्याला ठाणे कॉलेज आणि बेडेकर कॉलेज या नावांनीही ओळखले जाते, येथे कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कायदा अशा विविध शाखांचे शिक्षण देण्यात येते. हा कॅम्पस आज ठाण्यातील सर्वात समृद्ध उच्चशिक्षण केंद्रांपैकी एक मानला जातो. हिरवाईने नटलेला परिसर, आधुनिक पायाभूत सुविधा, शैक्षणिक उत्कृष्टता आणि विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड यासाठी विद्या प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुलाची खास ओळख आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि सक्रीय प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व नोकरीच्या संधी सतत उपलब्ध होत असतात. संस्थेच्या वारशाबद्दल बोलताना डॉ. महेश बेडेकर यांनी अभिमान व्यक्त करत म्हटले: “विद्याप्रसारक मंडळ हा ठाण्याचा खरा स्वभाव मांडतो—शिस्तबद्ध, प्रगतिशील आणि शिक्षणाशी घट्ट बांधलेला. आमचे विद्यार्थी केवळ शिक्षणच नव्हे, तर मूल्ये, संधी आणि दिशा घेऊन येथून बाहेर पडतात. कोकण प्रदेशातही विद्याप्रसारक मंडळाचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे; दृष्टीने सुंदर आणि वास्तवात सहजतेने राबवता येतील अशी संस्थांची निर्मिती ते सातत्याने करीत आले आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने विद्या प्रसारक मंडळ हे ठाण्याच्या शैक्षणिक पटलावरील मानबिंदू ठरले आहे.
यावेळी बोलताना डॉ. महेश बेडेकर म्हणाले की ,गेल्या नऊ दशकांत विद्या प्रसारक मंडळाने शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक संस्थांच्या विस्तृत जाळ्यात रूपांतर केले आहे, जे आज दररोज जवळपास 17,000 विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करते. ठाण्यातील नौपाडा ,चेंदणी रोड आणि कोकणातील वेळणेश्वर या तीन प्रमुख कॅम्पसमधून मंडळ हे प्राथमिक शिक्षणापासून ते पीएचडी पर्यंतचे उच्च शिक्षण उपलब्ध करून देते.कायदा, विज्ञान, कला ,वाणिज्य,व्यवस्थापन, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाचे 3 लाखांहून अधिक माजी विद्यार्थी आज संपूर्ण जगात अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. 2009 साली स्थापन केलेली London Academy of Education and Research सारखे आंतरराष्ट्रीय उपक्रम आणि भविष्यात स्वतःचे विद्यापीठ स्थापण्याची दृष्टी या माध्यमातून VPM ठाणे आणि कोकणातील शैक्षणिक क्षेत्र घडवत आहे. 90 वर्षे पूर्ण करताना मंडळ,ज्यांनी ही परंपरा घडवली आणि आजही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयाला बळ देत आहेत, अशा आपल्या संस्थापक, देणगीदार, प्राध्यापक,कर्मचारी, हितचिंतक आणि विद्यार्थ्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे.
हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे तरी सर्व ठाणेकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी डॉ .महेश बेडेकर यांनी केले.






