
Image
Panvel Municipal Corporation Recruitment 2026: पनवेल महानगरपालिकेतील ठराविक कामकाजाकरिता शासकीय, निमशासकीय कार्यालये, सिडको, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेतील सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी थेट मुलाखतीचे (Walk-in Interview) आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या १० जून २०१५ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवली जात आहे.
या भरतीद्वारे वर्ग १ व वर्ग २ संवर्गातील निवृत्त अधिकारी (०१ पद) आस्थापना विभागासाठी आणि वर्ग १ व वर्ग २ संवर्गातील निवृत्त लेखाधिकारी (०१ पद) लेखापरीक्षण विभागासाठी निवडले जातील. दोन्ही पदांसाठी संबंधित विभागात (आस्थापना किंवा लेखापरीक्षण) किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार मासिक पारिश्रमिक (मानधन) दिले जाईल.
SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
इच्छुक व पात्र उमेदवारांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता ‘आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, तिसरा मजला, पनवेल’ येथे उपस्थित राहावे. उमेदवारांनी सोबत आपली मूळ कागदपत्रे, सेवानिवृत्तीचे प्रमाणपत्र, अंतिम वेतन प्रमाणपत्र, ना-विभागीय चौकशी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.panvelcorporation.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.