Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकमध्ये ५ हजारहून अधिक जागांची भरती; ‘असा’ करा अर्ज!

PNB ने देशभरातील विविध राज्यांमध्ये 5,138 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवार 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 23, 2026 | 03:51 PM
पंजाब नेशनल बँक

पंजाब नेशनल बँक

Follow Us
Follow Us:
  • पंजाब नेशनल बँकमध्ये ५ हजारहून अधिक जागांची भरती
  • या संधीसाठी असा कराल अर्ज
  • पंजाब नेशनल बँकमध्ये मानधन किती मिळणार?
Bank Career News : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एक सुवर्णसंधी आणली आहे. बँकेने ‘अप्रेंटिस कायदा १९६१ ‘अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्या तरुणांना बँकिंग ऑपरेशन्स शिकायचे आहेत आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी म्हटली जात आहे. पंजाब नॅशनल बँकेत अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत pnb.bank.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येतील. ही रिक्त पदे देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलेली असून, यामुळे स्थानिक तरुणांना त्यांच्याच क्षेत्रात काम शिकण्याची संधी मिळणार आहे.

218000 मिळणार पगार! असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

पदांसाठी पात्रता आणि वयोमर्यादा काय?

पीएनबीने एकूण ५,१३८ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीचा निकाल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जाहीर झालेला असावा. वयोमर्यादेचा विचार करता, १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००६ च्या दरम्यान झालेला असावा).

निवड प्रक्रिया कशी असेल?

पीएनबी अप्रेंटिस निवड प्रक्रिया प्रामुख्याने ३ टप्प्यांत पार पडेल –  १. ऑनलाइन लेखी परीक्षा: यामध्ये जनरल नॉलेज, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात नियोजित आहे. २. स्थानिक भाषा चाचणी: उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करत आहे, त्या राज्यातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. ही परिक्षा स्थानिक भाषेशी निगडीत असणार आहे. ३. कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी: अंतिम निवड गुणवत्ता यादी आणि शारीरिक पात्रतेवर आधारित असेल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी प्रथम BFSI Sector Skill Council पोर्टलच्या ‘करिअर’ विभागाद्वारे किंवा PNB च्या अधिकृत वेबसाईट pnbindia.in वर नोंदणी करावी आणि त्यानंतर अर्ज भरून आपला फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

अर्ज शुल्क:

सामान्य/OBC/EWS (पुरुष): ९४४ रुपये.

सामान्य/OBC/EWS (महिला): ७०८ रुपये.

SC/ST/दिव्यांग/ट्रान्सजेंडर: २३६ रुपये.

मानधन (Stipend) किती मिळेल?

अप्रेंटिसचा कालावधी १२ महिने (१ वर्ष) असेल. निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पोस्टिंगनुसार मासिक विद्यावेतन दिले जाईल:

महानगरांसाठी: दरमहा १५,००० रुपये.

शहरी/निम-शहरी/ग्रामीण शाखांसाठी: दरमहा १२,३०० रुपये. याव्यतिरिक्त कोणताही इतर भत्ता दिला जाणार नाही.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्…

Web Title: Pnb recruitment 2026 5138 apprentice posts apply online marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Bank Exam
  • career guide
  • Career News
  • Punjab National Bank

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
2

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
3

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
4

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.