शैक्षणिक प्रशिक्षणासाठी १७ कोटी मंजूर (फोटो- istockphoto)
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
17 कोटींच्या निधीला देण्यात आली मंजूरी
२०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रशिक्षण आराखड्यास मान्यता
पुणे: महाराष्ट्र शासनच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा तसेच परदेशी भाषा प्रशिक्षण देण्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ₹१७.०७८२ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी निधी नियंत्रक अधिकारी (Career News) म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेचे लेखाधिकारी आहरण आणि सर्वितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा जसे की युपीएससी, एमपीएससी, तसेच परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जीआरई, टीओइएफएल, आय ईएलटीएस आदी परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय परदेशी भाषा प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व प्रशासकीय सेवांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
218000 मिळणार पगार! असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?
मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रशिक्षण आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार यापूर्वी ६० कोटी निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी उपलब्ध निधीतून आता १७.०७८२ कोटींचे अतिरिक्त वितरण करण्यात येणार आहे.
RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक
अटी अन् शर्ती
-निधी सन २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील उद्दिष्टांनुसारच खर्च करावा.
-प्रत्यक्ष खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
-निधी केवळ मंजूर प्रयोजनासाठीच वापरला जाईल.
-विहित कार्यपद्धतीनुसार खर्चाची खातरजमा करावी.
-योजनेचा मासिक भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल शासनास सादर करावा.
-निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक राहील.
निधी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातच खर्च करणे बंधनकारक आहे.
असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी
राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने (CURAJ) असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. विविध विषयांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून, निवडलेल्या उमेदवारांना UGC नियमांनुसार वेतन मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्जासोबतच अर्जाची हार्ड कॉपी २३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सादर करणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.






