प्रोफेसर पदासाठी उमेदवाराने संबंधित विषयात PhD केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये किमान १० शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेत किमान १० वर्षांचा अध्यापन किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सर्व पात्रता निकष UGC मानकांनुसार असणे अनिवार्य आहे.
असिस्टंट प्रोफेसर पदासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयात किमान ५५% गुणांसह मास्टर डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केलेला असावा. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात PhD आहे, त्यांना UGC च्या नियमांनुसार ‘नेट’ परीक्षेतून सूट मिळणार आहे.
प्रोफेसर पदासाठी वेतन पातळी १४ अंतर्गत मासिक पगार १,४४,२०० ते २,१८,२०० रुपये इतका असेल. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही वेतन पातळी १० अंतर्गत मासिक पगार ५७,७०० ते १,८१,४०० रुपये इतका असेल. याची निवड प्रक्रिया ही उमेदवारांची निवड सादरीकरण (Presentation/Seminar) आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
खुल्या प्रवर्गासाठी, EWS आणि OBC साठी अर्ज भरण्याची फी १५०० रुपये इतकी आहे. SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी ७५० रुपये इतकी आहे. शुल्क भरण्याची संपुर्ण प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाइन असणार आहे.
विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला www.curaj.ac.in भेट द्या. ‘Recruitment’ किंवा ‘Jobs’ विभागावर क्लिक करा. संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मग ऑनलाइन फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क जमा करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या. ही हार्ड कॉपी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह २३ मार्च २०२६ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.






