Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट

MPSC: प्रतिक शिंदे यांनी छोटीमोठी कामे करत बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केले. पुढे पुण्यातील एच व्ही देसाई अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2025 | 05:37 PM
आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट

आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: राज्य सेवा आयोगाच्यावतीने २०२३मध्ये घेण्यात आलेल्या महसूल सहायक परीक्षेत प्रतिक शिंदे यांनी यश संपादन केले असून त्यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये झाली आहे. प्रतिक शिंदे यांच्या आई सरला या अंगणवाडी सेविका असून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे प्रतिक यांच्यासह सरलाताईंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीमुळे सर्व स्तरातून प्रतिक शिंदे यांचे कौतुक होत आहे.

एमपीएससीकडून नुकतीच महसूल सहायक पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रतिक शिंदे यांनी ११३व्या रँकने ही परीक्षा उत्तीर्ण केली. प्रतिक शिंदे यांच्या वडीलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आई सरला शिंदे यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची होती. त्याला भाऊ विशाल शिंदे यानेही साथ दिली.

प्रतिक शिंदे यांनीही छोटीमोठी कामे करत बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केले. पुढे पुण्यातील एच व्ही देसाई अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. प्रतीक शिंदे हे मूळ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आहेत. ग्रामीण भागातून पुण्यात ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आले. कठोर मेहनत करत प्रतीक शिंदे यांनी आज या पदापर्यंत मजल मारली आहे.  चार वर्षांचे अथक परिश्रम आणि सातत्य यामुळे त्यांना महसूल सहायक पदाला गवसणी घालता आली. त्यामुळे आपल्या गावाचा नावलौकिक उंचावल्याचा आनंद वाटत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कोणताही क्लास न लावता स्वअभ्यासाने हे यश मिळवले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई आणि शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेरणेला दिले आहे.

प्रतिक शिंदे यांचे शिक्षण एमए राज्यशास्त्र विषयात झाले असून ते सध्या कायद्याचाही अभ्यास करत आहेत. त्यांना वाचन आणि वक्तृत्वाची आवड आहे. शासकीय नोकरीच्या माध्यमातून लोकसेवाचा आदर्श उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. श्रीमाताजी निर्मलादेवी यांच्या सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासासाठी प्रेरणा मिळाली आणि एकाग्रता साध्य करता आली, असे त्यांनी नमूद केले.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास खरोखरच आव्हानात्मक आहे. मात्र, अभ्यासामध्ये सातत्य असल्यास यश् मिळविता येते, हे मी माझ्या उदाहरणावरुन सांगू शकतो. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्याथ्र्यांनी वेळेबाबत काटेकोर राहिले पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन करुन अभ्यास करावा, तसेच आपल्या यशाचा पाठपुरावा करताना एक डेडलाईन ठरवावी. त्यामुळे नैराश्य येणार नाही.

– प्रतिक शिंदे, महसूल सहायक

Web Title: Prateek shinde clear mpsc exam and is working as a revenue assistant navarashtra struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • mpsc jobs
  • Nashik News
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर
1

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Nashik Child Skeleton Found: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा; चप्पल पाहून आईचा आक्रोश
2

Nashik Child Skeleton Found: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा; चप्पल पाहून आईचा आक्रोश

Maharashtra weather: महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; वर्षाअखेरीपर्यंत थंड हवामान कायम राहणार
3

Maharashtra weather: महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; वर्षाअखेरीपर्यंत थंड हवामान कायम राहणार

Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान…
4

Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.