Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विद्यापीठात 133 कंत्राटी प्राध्यापकांची भरती, दरमहा 50 हजार रुपये मानधन; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध विभागांतील १३३ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, ३१ मे २०२७ पर्यंत राहणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 12:40 PM
पुणे विद्यापीठात 133 कंत्राटी प्राध्यापकांची भरती, दरमहा 50 हजार रुपये मानधन; 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

पुणे विद्यापीठात 133 कंत्राटी प्राध्यापकांची भरती, दरमहा 50 हजार रुपये मानधन; 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Follow Us
Follow Us:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध विभागांतील १३३ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, ३१ मे २०२७ पर्यंत राहणार आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज प्रक्रिया २३ मे पासून सुरू होणार आहे. १ जून २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

 

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपये एकत्रित मानधन दिले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविद्या, आंतरविद्याशाखीय अभ्यास तसेच इतर विभागांमध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विभागात जैवतंत्रज्ञान, ऊर्जा अध्ययन,  रसायनशास्त्र,  संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणित, माध्यम व संवाद अध्ययन,  भौतिकशास्त्र,  तंत्रज्ञान, डेटा सायन्स आदी विषयांमध्ये भरती होणार आहे. त्याचबरोबर वाणिज्य,  व्यवस्थापन,  इंग्रजी,  कायदा,  इतिहास,  मानसशास्त्र,  समाजशास्त्र, पत्रकारिता,  शिक्षण, क्रीडा शिक्षण, संगीत आणि नाट्यकला अशा विविध शाखांतील उमेदवारांनाही संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

आरक्षणानुसार पद संख्या

आरक्षणानुसार एकूण १३३ पदांपैकी १७ पदे अनुसूचित जाती, ९ अनुसूचित जमाती, २५ ओबीसी, १३ ईडब्ल्यूएस आणि ३८ खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच महिला, क्रीडा प्रवर्ग, दिव्यांग आणि अनाथांसाठीही स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी ५ तर अनाथांसाठी १ पद राखीव ठेवण्यात आले आहे.

पात्रता आणि अटी

विद्यापीठाने उमेदवारांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता स्पष्ट केली आहे. संबंधित विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक असून यूजीसीच्या नियमानुसार नेट, सेट किंवा पीएच.डी. पात्रता बंधनकारक राहणार आहे. काही विशेष शाखांसाठी एआयसीटीईच्या निकषांनुसार अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पात्रताही आवश्यक असेल.

हे सुद्धा वाचा : झेडपीची गोठवलेली बँक खाती अखेर पूर्ववत; पेन्शनधारकांचे थकीत वेतन तातडीने वितरित होणार

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क १ हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. अर्जदारांनी मुलाखतीवेळी सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे.

 

Web Title: Pune university has announced the recruitment process for the posts of contractual assistant professor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • pune news
  • Teachers
  • Teachers Salary

संबंधित बातम्या

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
1

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
2

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस
3

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
4

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.