
QUAD
QUAD Foreign Ministers Meeting 2026:आज नवी दिल्ली ‘क्वाड’ (QUAD) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोठी बैठक होत असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा, चीनची वाढती ताकद, सागरी मार्गांची सुरक्षा, पुरवठा साखळी, सायबर सुरक्षा आणि जागतिक तणाव यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समूह आता जागतिक महासत्तांमध्ये समतोल राखणारा एक अत्यंत महत्त्वाचा गट बनला आहे.
‘क्वाड’ (QUAD) म्हणजेच ‘क्वाड्रीलेटरल सेक्युरिटी डायलॉग‘ (Quadrilateral Security Dialogue) होय. यांचा मुख्य उद्देश इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि मुक्त सागरी व्यापार सुनिश्चित करणे, हा आहे.
या गटाची पायभरणी २००४ मधील हिंद महासागरातील भीषण त्सुनामीच्या काळात झाली. जेव्हा चार देशांनी एकत्र येऊन मदत आणि बचाव कार्य राबवले होते. पुढे मे २००७ मध्ये अधिकृतपणे या गटाची पहिली बैठक झाली.
हवामान बदल: स्वच्छ हायड्रोजन, ग्रीन शिपिंग आणि आपत्ती व्यवस्थापनावर एकत्र काम करणे.
नवीन तंत्रज्ञान: सुरक्षित पुरवठा साखळीसाठी 5G नेटवर्क आणि प्रगत दूरसंचार तंत्रज्ञानाचा विकास करणे.
सायबर सुरक्षा: डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी सामायिक रणनीती आखणे.
आरोग्य सुरक्षा: भविष्यातील महामारीचा सामना करण्यासाठी ‘हेल्थ सिक्युरिटी पर्टनरशिप’ची स्थापना केली.
पायाभूत सुविधा: इंडो पॅसिफिक देशांमध्ये केबल कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत विकासासाठी तांत्रिक मदत पुरवणे.
अंतराळ सहकार्य: हवामान बदलावर आणि सागरी हलचालींवर देखरेख करण्यासाठी उपग्रहाद्वारे डेटाचे समायोजन करणे.
इंडो पॅसिफिक क्षेत्रात भारताचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याने भारताची भूमिका क्वाडमध्ये केंद्रस्थानी आहे, भारताच्या पुढाकाराने सुरू झालेला ‘एचएडीआर’ (HADR -आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम) हा गटाचा मुख्य भाग आहे. आगामी काळात क्वाड देशांची मोठी शिखर परिषद भारतात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. सध्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या सायबर समस्यांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील ही बैठक आगामी काळातील जागतिक रणनीती ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.